Bheed Teaser 
मनोरंजन

Bheed Teaser : 'फाळणी देशाची नव्हे तर समाजाची!' वेदनादायी 'भीड' चा टीझर व्हायरल

बॉलीवूडमध्ये वेगळ्या विषयावर तितक्याच प्रभावीपणे मांडणी करुन त्याचे सादरीकरण करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये अनुभव सिन्हा यांचे नाव घ्यावे लागेल.

सकाळ डिजिटल टीम

Bheed Movie Teaser : बॉलीवूडमध्ये वेगळ्या विषयावर तितक्याच प्रभावीपणे मांडणी करुन त्याचे सादरीकरण करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये अनुभव सिन्हा यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांच्या यापूर्वीच्या आर्टिकल 15 चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.आता ते एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत.

सोशल मीडियावर सिन्हा यांच्या भीड या चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. तो टीझर पाहिल्यानंतर सिन्हा यांनी नेहमीप्रमाणे यावेळी देखील एका संवेदनशील विषयाला हात घातल्याचे लक्षात येते. कुणी काही का म्हणेना आपल्याला ज्या विषयाची मांडणी करावीशी वाटते त्यावर वाट्टेल ते झाले तरी चालेल पण निर्मिती करायचीच, असा होरा असणाऱ्या सिन्हा यांच्या या चित्रपटाची चाहते उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.

Also Read - तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

टीझर पाहिल्यानंतर लक्षात येते अजुनही आपल्याला आणखी किती गोष्टींसाठी लढावे लागले आहे, येत्या काळात देखील संघर्ष आणखी किती बिकट आहे या साऱ्या गोष्टींना सिन्हा यांनी चित्रबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाचा टीझर पाहिल्यावर नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत.

कोरोनाचे दिवस आठवले की आजही अंगावर काटा येतो. त्यावेळचे चित्र भयानक होते. कामगारांना काही करुन आपल्या घरी जायचे होते. काहींनी तर पायीच आपले घर गाठले होते. अशात कित्येकांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रवासादरम्यान कामगारांना ज्या संकटांचा आणि अडचणींचा सामना करावा लागला त्याविषयी बोलणारा हा चित्रपट आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या टीझरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

एका सामाजिक-राजकीय विषयावरील या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सोसल मीडियावर जो टीझर व्हायरल झाला आहे त्यामध्ये जी कॅप्शन देण्यात आली त्यात म्हटले आहे की, फाळणी ही काही देशाची झाली नाही तर ती समाजाची झाली आहे. हा चित्रपट २४ मार्च रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT