Akanksha Dubey, Akanksha Dubey news, Akanksha Dubey suicide SAKAL
मनोरंजन

२४ वर्षिय आकांक्षा दुबेनं काही वर्षात जमवली बरिच संपत्ती! होती इतक्या कोटींची मालकीन

सकाळ डिजिटल टीम

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने आत्महत्या केली आहे. वाराणसीतील एका हॉटेलमध्ये अभिनेत्रीचा मृतदेह सापडला आहे. अभिनेत्रीने हे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या बातमीनंतर भोजपुरी इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

आकांक्षा दुबेच्या आत्महत्येच्या काही तासांपूर्वी तिचे 'ये आरा कभी हरा नही' हे शेवटचे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचा व्हिडिओ पवन सिंग आणि आकांक्षा यांच्यावर शूट करण्यात आला आहे.या गाण्याच्या व्हिडिओला काही वेळातच 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

पवन सिंगसोबत काम केल्यानंतर आकांक्षा दुबेला फिल्मी दुनियेत चांगली ओळख मिळाली. त्यानंतर तिच्यामागे बड्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांची रांग लागली होती. आकांक्षा दुबेने तिच्या एका चित्रपटासाठी दोन लाख रुपये आकारण्यास सुरुवात केली. तिची एका महिन्याच्या कमाईबद्दल बोललो तर ती ₹ 60000कमावत होती. तिची एकूण संपत्ती 25 ते 35 लाख रुपये होती असा दावा करण्यात येत आहे.

आकांक्षा दुबेची एकूण संपत्ती जाणून घेतल्यावर, तिच्या मृत्यूचे कारण आर्थिक चणचण नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ती चांगली कमाई करत होती. आकांक्षा दुबेच्या मृत्यूनं तिचे कुटुंब हादरलं आहे. ती दोन भावांची ती एकुलती एक बहीण होती.

तर ती समर सिंहसोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होती. ती रोज सोशल मीडियावर समर सिंहबद्दलचे प्रेम व्यक्त करत असे. आकांक्षा आणि समरची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती.

आकांक्षा दुबेने भोजपुरी इंडस्ट्रीत तिच्या करिअरची सुरुवात राकेश मिश्रा यांच्या 'तू जवान हम लइका' या म्युझिक व्हिडिओमधून केली होती. हा म्युझिक व्हिडिओ चांगलाच यशस्वी झाला होता. यानंतर आकांक्षाने प्रत्येक भोजपुरी स्टारसोबत बुलेट पे जिजा, करवतिया यांसारख्या अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये भोजपुरी कलाकारांसोबत काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coaching Center Blast: भयंकर! कोचिंग सेंटरमध्ये मोठा स्फोट, दोन विद्यार्थी जागीच ठार, अनेक जखमी, घटनेने खळबळ

Madha Flood Crisis : मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची आशा : गोपीचंद आमदार पडळकर

Latest Marathi News Live Update : पिकविमा जुलैमध्ये सुरू करण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

FASTag New Rule : आता नाही द्यावा लागणार डबल टोल! 'UPI पेमेंट'ने पैसे वाचणार

KDMC News : 14 गाव, 27 गाव आताच बाहेर काढून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करा, 27 गाव संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT