Akanksha Dubey Suicide Esakal
मनोरंजन

Akanksha Dubey Suicide: प्रेमात धोका अन् आत्महत्या? काय आहे आकांक्षाच्या मृत्यूचे रहस्य?

Vaishali Patil

सध्या मनोरंजन विश्वाला ग्रहण लागल्याचं दिसत आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलीवूड अनेक महान कलाकार यांच्या मृत्यूच्या धक्क्यातुन बाहेर निघत नाही तेच आता आता भोजपुरी सेलिब्रिटींचा मृत्यू झाला आहे.

भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली ज्यानंतर सर्वच कलाकार धक्क झाले आहे. अभिनेत्री आकांक्षा दुबे हिनं आत्महत्या केली आहे. शूटिंगनंतर ती हॉटेलमध्ये गेली आणि तिथे आत्महत्या केली.

बनारसमधील सारनाथ हॉटेलमध्ये तिनं तिचं जीवन संपवलं आहे. बनारसमध्येच ती तिच्या एका प्रोजेक्टचं शूटिंग करत होती.

आकांक्षाने हे पाऊल का उचललं या मागच कारण अद्याप समोर आलेलं नाही.हॉटेलमध्ये गेल्यावर अचानक असे काय झाले? असे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. लवकरच याची माहिती मिळेलं.

आकांक्षा दुबेबद्दल सांगायचं झालं तर तिचा जन्म 1997 मध्ये उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे झाला. 2019 मध्ये 'मेरी जंग मेरा फैसला' या चित्रपटातून आकांक्षाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यात तिची छोटीशी भूमिका होती.

त्यानंतर आकांक्षाने 'मुझसे शादी करोगी' आणि 'साजन' सारखे चित्रपट केले. आकांक्षा दुबेला नृत्य आणि अभिनयाची खूप आवड होती.

ती टिकटॉकपासून इंस्टाग्रामपर्यंत खूप सक्रिय होती. आकांक्षा दुबे अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडिओ आणि रील इन्स्टाग्रामवर शेअर करत असे. आत्महत्येच्या एक दिवस आधीही आकांक्षा दुबेने तिचा एक रील इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

आकांक्षा दुबेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती अभिनेता समर सिंगला डेट करत होती.

यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आकांक्षा दुबेने इंस्टाग्रामवर रोमँटिक फोटो शेअर करून समर सिंहसोबतचे नाते अधिकृत केले.

तिच्या इन्स्टाग्रामवरच्या स्टोरीला पाहिल्यानंतर तिचं ब्रेकअप झालं होतं का असा प्रश्न उपस्थीत झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Marathi News Live Updates:जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पडळकर, विशाल पाटील आणि सत्यजित देशमुखांना दिलासा; अर्ज वैध, काही अर्ज अवैध ठरल्याने राजकीय घडामोडींना वेग

एका ओव्हरमध्ये ६ षटकार ठोकायचेत! वैभव सूर्यवंशीने सांगितली भविष्यातील ६ मोठ्या स्वप्नांची यादी; नंबर-१ पाहून चाहतेही चक्रावले

SCROLL FOR NEXT