Akanksha Dubey New CCTV Footage Google
मनोरंजन

Akanksha Dubey च्या मृत्यूआधीचं सीसीटीव्ही फूटेज लागलं हाती, कार ते हॉटेल रुम दरम्यान काय-काय घडलं ते सगळं आलं समोर..

आकांक्षा दुबे ही भोजपुरी अभिनेत्री २५ मार्च रोजी रात्री वाराणसी येथील सारनाथच्या सोमेंद्र हॉटेलमधील रुममध्ये मृत अवस्थेत सापडली होती.

प्रणाली मोरे

Akanksha Dubey: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर अख्खी इंडस्ट्री हादरली होती. आकांक्षा दुबे २५ मार्च रोजी रात्री वाराणसी येथील सारनाथच्या सोमेंद्र हॉटेलमधील रुममध्ये मृत अवस्थेत सापडली होती.

बोललं जातं की आकांक्षा दुबेनं गळफास घेत आत्महत्या केली होती. आता याच दिवशीच्या रात्रीचा थरार सांगणारा सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. ज्यामध्ये रात्री उशिरा दीड वाजता आकांक्षा कारमधून उतरून हॉटेलच्या दिशेनं चालताना दिसत आहे. (Bhojpuri Actress Akanksha Dubey Death New CCTV Footage)

जवळपास ४ मिनिटं ४० सेकंदाचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे. या फूटेजमध्ये आकांक्षा कार मधून एका व्यक्तीसोबत उतरते आणि हॉटेलच्या आत जाताना दिसत आहे. यानंतर ती हॉटेलचे जीने चढताना दिसत आहे. ते चढताना आकांक्षा गॅलरीमध्ये थांबते आणि बॅगेत काहीतरी शोधताना दिसत आहे.

मध्ये-मध्ये तिच्यासोबत असलेला तो माणूसही तिला मदत करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहून तरी असं दिसत आहे की ती जे काही बॅगेत शोधतेय तेव्हा चिंताग्रस्त आहे कारण ते तिला सापडत नाहीय.

आणि त्याच अवस्थेत ती हॉटेलच्या रुमच्या दिशेनं चालतेय. तो माणूस देखील तिच्या मागे मागे जातोय. बोललं जात आहे की या व्हिडीमुळे पोलिसांना आकांक्षा दुबेच्या मृत्यूचा गुंता सोडवायला मदत होईल.

आकांक्षा शेवटची याच सीसीटीव्ही फूटेज मध्ये दिसत आहे. पोलिस सध्या या केसच्या तपासात व्यस्त आहेत आणि वाटतंय की हे सीसीटीव्ही फूटेज आता पोलिसांना आकांक्षाची केस सोडवण्यास मदत करू शकते.

आकांक्षा दुबेच्या आईच्या तक्रारीनंतर भोजपुरी गायक आणि अभिनेता समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांच्या विरोधात ३०६ अॅक्ट अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे.

आकांक्षा तिच्या निधनाच्या ठिक २ दिवस आधी या हॉटेलमध्ये थांबली होती. आकांक्षा एका सिनेमाच्या शूटिंगसाठी वाराणसी येथे गेली होती.

हॉटेल मॅनेजरनं सांगितलं की आकांक्षा दुबे २५ तारखेला रात्री जवळपास ८ वाजता हॉटेलमधून एका पार्टीत सामिल होण्यासाठी निघाली होती आणि जवळपास दीड वाजता ती हॉटेलमध्ये परतली. यादरम्यान आकांक्षासोबत एक माणूस होता. रिपोर्टनुसार,आकांक्षा जेव्हा पुन्हा हॉटेलमध्ये परतली तेव्हा ती मद्यधुंद अवस्थेत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT