Bhojpuri Actress Priyansu Singh physically accused of her close friend Puneet Singh after luring her to marry  SAKAL
मनोरंजन

Priyansu Singh: धक्कादायक! भोजपुरी अभिनेत्रीचा जवळच्या व्यक्तीवर बलात्काराचा आरोप

भोजपुरी अभिनेत्रीचा जवळच्या मित्राने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Devendra Jadhav

Bhojpuri Actress Rape Case News: भोजपुरी अभिनेत्री प्रियांसू सिंगने तिच्या सहकलाकार पुनित सिंगवर बलात्काराचा आरोप केला आहे. तिने त्याच्यावर गंभीर आरोप केले आणि 29 ऑगस्टला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तिच्या सहकलाकाराने तिला 'अनैसर्गिक' गोष्टी करायला लावल्याचा दावा करत अभिनेत्रीने FIR दाखल केला. ETimes ला दिलेल्या मुलाखतीत, भोजपुरी अभिनेत्रीने आरोप केला की तिच्या सहकलाकाराने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

(Bhojpuri Actress physically accused of her close friend after luring her to marry)

भोजपुरी अभिनेत्रीने को-स्टारवर केला बलात्काराचा आरोप

ETimes शी बोलताना, भोजपुरी अभिनेत्री प्रियांसू म्हणाली, "जेव्हा मी माझ्या कारकिर्दीच्या शिखरावर होते, तेव्हा मी त्याला सोशल मीडियावर भेटले. आम्ही बोलणं सुरु केलं. सुरुवातीला तो माझ्याशी खूप गोड आणि विनम्र वागला. चित्रपट उद्योगात येण्याची त्याची इच्छा होती. मी त्याला माझ्या ओळखीच्या लोकांच्या माध्यमातुन काम मिळवून देण्यास मदत केली. पुढे दिवसेंदिवस आमच्यातले संबंध चांगले झाले. तो नेहमी म्हणायचा की तो माझ्याशी लग्न करेल. काही काळानंतर, तो माझ्या घरीही यायला लागला."

मित्राने जबरदस्ती केली अन्...

प्रियांसूने पुढे दावा केला की, "एक दिवस मी एकटी असताना, तो अचानक माझ्या घरी आला आणि दारूच्या नशेत माझ्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा मी रडले आणि त्याला काल रात्री जबरदस्तीने केलेल्या कृत्याबद्दल सांगितले. मी पोलीस स्टेशनला जाईन असा इशाराही दिला.

त्याने रडत रडत माझी माफी मागितली आणि घरच्यांना पटल्यावर लवकरच माझ्याशी लग्न करेन असे सांगून त्याने माझे सांत्वनही केले. पण त्याने पुन्हा तेच केले. त्याने पुन्हा एकदा माझ्यावर जबरदस्ती केली. मला काहीगोष्टी करायला भाग पाडल्या जे मला करायचे नव्हते. त्याने माझे केस पकडून अनैसर्गिक गोष्टी करायला लावल्या."

अभिनेत्रीने या सर्व प्रकरणी 29 ऑगस्ट 2023 रोजी पुनित सिंग विरोधात तक्रार दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT