Bhojpuri Song Double Meaning now banned : मनोरंजन विश्वामध्ये केवळ बॉलीवूडच्या हिंदी गाण्यांचा चाहतावर्ग नाहीतर भोजपूरी गाणी ऐकणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्या गाण्यांचे शब्द, त्याचा लहजा आणि त्या गाण्यांची चाल श्रोत्यांना भलतीच आवडलेली दिसते. मात्र याच भोजपूरी गाण्यांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
भोजपूरी गाण्यांनी नेटकऱ्यांची, चाहत्यांची मोठी पसंती मिळवली आहे. या गाण्यांच्याबाबत एक गोष्ट नेहमीच बोलली जाते ती म्हणजे ही गाणी डबल मिनिंग (द्विअर्थी) अशा स्वरुपाची आहेत. त्यामुळे त्या गाण्यांवर बंदी घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर त्यावरुन ट्रेंडही व्हायरल होत आहे. उत्तर भारतामध्ये एकीकडे बुलडोझर कारवाई मोठ्या प्रमाणात असताना दुसकीकडे आता मनोरंजन क्षेत्रालाही देखील मोठा हादरा बसला आहे.
Also Read - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
बऱ्याचकाळापासून ही मागणी होताना दिसते आहे. बिहार सरकारनं याबाबत कारवाई करण्याविषयी सांगितलं आहे. त्या गाण्यांमध्ये जातीवाचक आणि अश्लील शब्दांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
बिहार सरकारनं अशा गाण्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्या गाण्यांच्याविरोधात कारवाई करण्याविषयी पावलं उचलली आहेत. बिहारमधील अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्याविषयी सुचना पाठविण्यात आल्या आहेत.
गाण्यांमधील अश्लील शब्द आणि जातीवाचक गाणी यावरुन कॉग्रेसचे आमदार प्रतिमा कुमारी यांनी मुद्दा उचलून धरला होता. त्यांचे म्हणणे आहे की, विकास मंत्री बिजेंद्र प्रसाद यादव यांनी यावर भूमिका मांडली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, समाजामध्ये अशाप्रकारची गाणी येऊ नयेत. आपण एकमेकांच्या भावनांचा स्विकार करणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.