Bhupen Hazarika Birth Anniversary News Bhupen Hazarika Birth Anniversary News
मनोरंजन

Google's Doodle : भूपेन हजारिकांच्या ९६व्या जयंतीनिमित्त खास डूडल

आसाम विधानसभेत आमदार म्हणूनही काम केले

सकाळ डिजिटल टीम

Bhupen Hazarika Birth Anniversary News गुगल आज प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका (Bhupen Hazarika) यांची ९६ वी जयंती (Birth Anniversary) डूडलद्वारे साजरी करीत आहे. २०११ मध्ये निधन झालेले हजारिका हे संगीतकार, गायक, कवी, चित्रपट निर्माता आणि गीतकार होते. याशिवाय त्यांनी १९६७-७२ दरम्यान आसाम विधानसभेत आमदार म्हणूनही काम केले. ते सुधाकंठ म्हणून ओळखले जात होते. त्यांनी सहा दशकांच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटांमध्ये काम केले आहे.

८ सप्टेंबर १९२६ रोजी आसाममध्ये त्यांचा जन्म झाला. हजारिका ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर जीवनाविषयी गाणी आणि लोककथांनी वेढलेले होते. वयाच्या १० व्या वर्षी त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले. हजारिका यांनी १९४२ मध्ये आर्ट्समध्ये इंटरमिजिएट पूर्ण केले. तसेच १९४६ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून (बीएचयू) एमए पूर्ण केले.

यानंतर ते न्यूयॉर्कला रवाना झाले. तिथे ते ५ वर्षे राहिले आणि १९५२ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये डॉक्टरेट (पीएचडी) प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर हजारिका यांनी गुवाहाटीच्या ऑल इंडिया रेडिओमध्ये गायला सुरुवात केली. बंगाली गाण्यांचे हिंदीत भाषांतर करून गाण्यांना आवाजही दिला.

कालांतराने हजारिका (Bhupen Hazarika) यांनी अनेक रचना रचल्या. ज्या गाण्यांद्वारे लोकांच्या कथा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. आनंद आणि दुःखाच्या कथा, एकता आणि धैर्य, प्रेम आणि एकाकीपणा तसेच संघर्ष आणि दृढनिश्चयाच्या कथा देखील होत्या. काही वर्षांत रुदाली, मिल गई मंझिल मुझे, दरमियां, गजगामिनी, दमन, क्यूं यासारख्या सुपरहिट चित्रपटांतील गाणी गाऊन ते अनेकांच्या हृदयाचा आवाज बनले.

Bhupen Hazarika

मरणोत्तर भारतरत्न

हजारिका यांना संगीत आणि संस्कृतीतील अतुलनीय योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मभूषण यासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. २०१९ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT