bhushan 
मनोरंजन

भूषण प्रधानने केला भाग्यश्रीसोबतच्या नात्याचा खुलासा?

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- ‘घाडगे & सून’  मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमये व अभिनेता भूषण प्रधान एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. नुकताच भाग्यश्रीने तिचा वाढदिवस साजरा केला आणि तिच्या वाढदिवशी भूषणने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली ज्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय.

भाग्यश्रीसोबतचा फोटो पोस्ट करत भूषणने लिहिलं, 'मी किती खास आहे याची जाणीव तू मला कसं करून देते हे वर्णन करण्यासाठी कोणतेही शब्द पुरेसे नाहीत. तू जशी आहेस तशीच राहा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.' भूषणने दिलेल्या या शुभेच्छांवर भाग्यश्रीसुद्धा व्यक्त झाली. '..आणि तू नेहमीच माझा दिवस खास बनवतोस' अशी प्रतिक्रिया तिने दिली. याआधीही भाग्यश्री आणि भूषणच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर होत्या.

भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भूषणसोबतचा फोटो पोस्ट करत मजेशीर कॅप्शन दिलं होतं. ‘असा व्यक्ती जो मला आवडतो…आमच्या मागे उभा असलेला नव्हे…’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं. 

भाग्यश्रीने २०१७ मध्ये ‘घाडगे & सून’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत तिने साकारलेली अमृता प्रभुणेची भूमिका चांगलीच गाजली. त्यापूर्वी २०१४ मध्ये तिने ‘श्रावण क्वीन’चा किताब जिंकला होता. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती आयटी कंपनीत नोकरी करत होती.

भूषणने मराठी चित्रपट, वेब सीरिज व नाटकांमध्ये काम केलंय. भूषणने काही दिवसांपूर्वीच ‘सर्वांत आकर्षक पुरुष’चा किताब जिंकला आहे. तसंच ‘आम्ही दोघी’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘सतरंगी रे’, ‘मिस मॅच’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’ अशा अनेक सिनेमांमध्ये त्याने काम केलंय.

bhushan pradhan declares his love for bhagyashree limaye  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT