big b amitabh bachchan hit such a joke on virat kohli and anushka sharma fans laughing 
मनोरंजन

अनुष्काचं घर मोठ्ठं आहे, तिच्याकडे आहे 'विराट' खोली; अमिताभ असं का म्हणाले?

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन हे सहसा कुणाची टिंगल टवाळी करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आपण भले आणि आपले काम भले. अशा उक्तीप्रमाणं त्यांचं वागणं असतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून अमिताभ सोशल मीडियावर जरा जास्तच सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. त्यांनी आता प्रसिध्द अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची सोशल मीडियावर मस्करी केली आहे. त्यामुळे बिग बी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याची ती पोस्ट कमालीची व्हायरल झाली आहे. त्यांनाही अनुष्काच्या काही चाहत्यांनी प्रश्न विचारले आहेत. त्याकडे बिग बी यांनी दुर्लक्ष केले आहे. अमिताभ यांच्याविषयी सांगण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे ते त्यांच्या चित्रपटाच्या चित्रिकरणात जेवढे अॅक्टिव्ह असतात तेवढेच सोशल मीडियावरही. हे दिसून आले आहे.

अमिताभ यांनी अनुष्का आणि विराट यांच्याविषयी काही विशेष टिप्पणी केली आहे. त्यावेळी त्यांनी एक चुटकूलाही शेअर केला आहे. तो वाचल्यानंतर आपल्याला हसु आवरत नाही. काय म्हणाले अमिताभ जाणून घेऊयात. अमिताभ यांनी रंगी बेरंगी एक शर्ट घातला आहे. त्याचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी त्या फोटोला कॅप्शन देताना लिहिले आहे की, रंग अजून उतरला नाही आणि सणांवर केले जाणारे विनोद अजून बंद झाले नाहीत. अनुष्का आणि विराट यांच्या पूर्ण सन्मानार्थ ही पोस्ट लिहिली आहे. तसेच अनुष्काच्या जवळ एक मोठं अपार्टमेंट आहे. अनुष्काच्या जवळ विराट खोली आहे. असंही बिग बी यांनी म्हटलं आहे.

अमिताभ ब-याचदा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असताना वेगवेगळ्या सेलिब्रेटींची टिंगल टवाळी करताना दिसतात. त्यांच्या फॅन्सला त्यांचा हा अनोखा अंदाज पसंत आला आहे. त्यांनी बिग बींच्या त्या पोस्टला लाईक्स आणि कमेंटसही केल्या आहेत. ब-याचदा अमिताभ यांच्यावर चाहते प्रेम करतात तर कधी त्यांच्यावर टीकाही करतात. आताही त्यांच्यावर एका पोस्टमुळे टीकाही करण्यात आली आहे. मात्र त्यात फारसं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. अनुष्का आणि विराट कोहली हे त्यांच्या वेगळेपणामुळे नेहमीच चर्चेत असणारं कपल्स आहे.

आता अनुष्का आई झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचं काही मोठे प्रोजेक्ट सुरु होणार आहेत. दुसरीकडे बिग बी यांनी अमिताभ यांचेही अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. त्यात झुंड, चेहरे अशा चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय आलिया आणि रणबीरच्या ब्रम्हास्त्रमध्येही दिसणार आहेत. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Megablock: तीन दिवस विशेष ब्लॉक! लाेकल, मेल-एक्स्प्रेसवर परिणाम, वेळापत्रकात बदल; पाहा कधी आणि कोणत्या मार्गावर?

उमेदवारी नको पण हकालपट्टी टाळा, मुंबईला तिकिट मागायला गेलेल्या ४ भाजप पदाधिकाऱ्यांची फजिती; बारमध्ये काय घडलं?

'अरे ही तर म्हातारी...' शाहरुखच्या होणाऱ्या सूनेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, आर्यनची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?, व्हिडिओ व्हायरल

आम्ही नक्की काय समजायचं? भूषण प्रधानने शेअर केले अभिनेत्रीसोबतचे फोटो; पण प्रेक्षकांना वेगळीच शंका, चर्चांना उधाण

Viral Video: "मी मुस्लिम, पण मला भगवा रंग आवडतो"; आयफोन 17 च्या 'कॉस्मिक ऑरेंज' रंगाची क्रेझ!

SCROLL FOR NEXT