zubair khan
zubair khan 
मनोरंजन

बिग बॉस 11 मधील 'हा' स्पर्धक नैराश्यामध्ये; वाचा सविस्तर...

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर आता नैराश्येचा आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या एकेक कलाकारांच्या कहाण्या पुढे येऊ लागल्या आहेत. बिग बॉस 11 तसेच काही मालिकांमध्ये काम करणाऱ्या झुबेर खानने आपल्या फेसबुक अकाऊंटवर आपल्या नैराश्येची कहाणी लिहिली आहे. ती वाचल्यानंतर सगळ्यांचे मन नक्कीच हेलावल्याशिवाय राहणार नाही.

बिग बॉसच्या 11 व्या सीझनमध्ये झुबेर खानसह हिना खान, विकास गुप्ता, शिल्पा शिंदे आदी कलाकार सहभागी झाले होते. या शोमध्ये शिल्पा शिंदे विजेती ठरली होती. तर झुबेर खान पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडला होता. बिग बॉस शोचा होस्ट सलमान खान याच्याशी त्याचा तेव्हा काही तरी वाद झाला होता. त्यानंतर त्याने झोपेच्या गोळ्या खायला सुरुवात केली होती. 

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये झुबेर म्हणतो, की मी आज अल्लाहमुळे जिवंत आहे. गेली काही वर्षे मी मानसिक ताणतणावाखाली होतो. मला खूप नैराश्याने ग्रासलेले होते. त्यावरती उपाय सुरू आहेत. आजही मी एक मेन्टल पेशंट आहे आणि दररोज औषधे घेत आहे. नैराश्यातून आनंद मिळावा, यासाठी मी लहान मुलांमध्ये रमतो आहे. झुबेर खानचे स्वतःचे प्रॉड्क्शन हाऊस आहे आणि त्याद्वारे त्याने एका चित्रपटाची निर्मितीही केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT