Big boss 13 : Hindustani bhau
Big boss 13 : Hindustani bhau 
मनोरंजन

Big Boss 13 : वेटर ते युट्युब स्टार ; मराठमोळा 'हिंदुस्तानी भाऊ' आहे तरी कोण?

वृत्तसंस्था

मुंबई : बिग बॉस हा सर्वात जास्त मनोरंजक आणि तितकाच वादग्रस्त शो आहे. त्याची लोकप्रियता सर्वाधिक आहे. याच लोकप्रियतेमुळे आता बिग बॉसचं 13 वे सिझन चालु आहे. घरातील टास्क आणि भांडणे यांमुळे हा शो सतत चर्चेचा विषय ठरतो. वाइल़्ड कार्ड एन्ट्री कोणाची होणार हाही तितकाच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय आहे. सध्या घरामध्ये एन्ट्री झाली आहे ती एका मराठमोळ्या 'हिंदूस्तानी भाऊ'ची. तुम्ही त्याला सोशल मीडियावर अनेकदा पाहिलच असेल. जाणून घ्या हा  'हिंदुस्तानी भाऊ'  आहे तरी कोण ?

वाइल्ड कार्ड एन्ट्रीने बिग बॉसच्या घरात अनेकांनी प्रवेश केला आहे.त्यातच एक आहे विकास पाठक म्हणजेच 'हिंदुस्तानी भाऊ'. त्याला तुम्ही सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच त्याचे व्हीडिओ व्हायरल होताना पाहिलं असेलचं. सध्या त्याचा घरातील परफॉर्मन्स खूपच चांगला आहे. घरातील इतर सदस्यांना तो आवडला आहे. शिवाय त्याच्या हसमुख आणि मजेशीर वागण्यामुळे त्याचा घरातील खेळ चांगला सुरु आहे. शहनाज गिलचा 'मोस्ट एन्टरटेनिंग' चा किताब लवकरच विकास घेणार का अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु आहे. 

'पहली फुरसम मे निकल' हे वाक्य तुम्ही याआधी ऐकलचं असेल. य़ा वाक्याने आणि विकासच्या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातला होता. मुंबईतच विकासचा जन्म झाला. त्याचा आवडचा अभिनेता संजय दत्त आहे त्यामुळे विकासने त्याचा लुकही संजयसारखा केला आहे. युट्युबवर फेमस होण्याआधी विकासने प्रचंड मेहनत आणि कठीण काळ पाहिला आहे. त्यातुन परिश्रम घेत आज तो प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. विकासचे वडिलंची तो लहान असतानाच नोकरी गेली आणि त्यानंतर घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. अशावेळी घरोघरी अगरबत्ती विकणे, वेटर ही कामे त्याने केली. याचकाळात त्याचं शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं आणि 7 वीमध्येच त्याने शिक्षण सोडलं. त्यानंतर मुंबईच्या एका स्थानिक वृत्तपत्रासाठी रिर्पोटर म्हणूनही काम केलं. 

फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या पुलवामी हल्ल्यावर त्याने एक व्हिडीओ तयार केला होता. विकासचा हा व्हिडीओ एका रात्रीत व्हायर झाला. त्यानंतर विकासने देशाशी संबंधीत मुद्द्यांवर भाष्य करणारे व्हिडीओ करण्यास सुरुवात केली. त्याच्या व्हिडीओला आणि स्टाइलला लोकांनी खूप पसंत केलं. विकासच्या व्हिडीमधील 'पहिली फुरसत मै निलक' हा डायलॉग खूप फेमस झाला. आता विकासच्या यूट्युब अकाउंटवर लाखोंमध्ये फोलोअरस आहेत. 

आई-वडिल, पत्नी आणि एक मुलगा अशा त्याच्या परिवारासह तो मुंबईत राहतो. मुलग्याच्या नावाने विकास एक NGO पण चालवतो. ज्याच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत करण्याचं काम तो करतो आहे. बिग बॉच्या घरामध्ये विकासला सध्या खूप प्रेम मिळत आहे आणि लोकांकडून पसंतीही मिळत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT