Kangana Ranaut 'Lockup'-New Contestant from Big Boss 15 Google
मनोरंजन

कंगनाच्या 'लॉकअप' मध्ये फसला 'बिग बॉस' चा माणूस; नवीन रंजक वळण

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानं हा नवीन खुलासा झाला आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड क्वीन कंगना रनौत सध्या तिचा नवा रिअॅलिटी शो 'लॉकअप' (Lockup)मुळे भलतीच चर्चेत आहे. कंगनाचा हा शो २७ फेब्रुवारीपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऑल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेयर वर सुरु झाला आहे. या शो मध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेक ओळखीचे स्टार सहभागी झाले आहेत. सगळेच कंगनाच्या 'लॉकअप' मध्ये बंदिस्त आहेत. शो दरम्यान या सगळ्यांनाचा कंगना जे सांगेल ते ऐकावं लागत आहे. तिचे अत्याचार सहन करावे लागत आहेत,हे दिसून येतंय. पण आता शो मध्ये एक नवीन वळण लवकरच पहायला मिळणार आहे.

कंगनाच्या या शो मध्ये आता आणखी एक नवीन एन्ट्री होत आहे,जो कायम चर्चेत राहील आणि शो ला देखील चर्चेत ठेवेल असं बोललं जात आहे. पण या येणाऱ्या सदस्यासाठी देखील कंगनाच्या 'लॉकअप' मधील जगणं कठीण होणार आहे. अडचणींचा ससेमिरा त्याच्या मागे लागेल असं बोललं जात आहे. चला जाणून घेऊया,कोण आहे तो नवीन सदस्य?

कंगना रनौतच्या 'लॉकअप' मध्ये आता बिग बॉस १५ मधील स्पर्धक करण कुंद्राची दणक्यात एन्ट्री होताना आपण पाहणार आहोत. करण कुंद्राने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीच्या माध्यमातून त्यानं सांगितलं आहे की,'शराफत किस चिड़िया का नाम है लगता है ये सबको याद दिलाने का वक्त आ गया है। आ रहा हूं मैं क्वीन के इस बैडजेल में इन सबको लाइन पर लाने। असलिया का ये खेल तो अब शुरू होगा।' या व्हिडीओला शेअर करत करण कुंद्रानं कॅप्शन दिलं आहे की,'जब रानियां बुलाती हैं, तो तुम तैयार हो जाते हो और पहुंच जाते हो !! इस बद्दास जेल में आने वाला है एक बद्दास तूफान,आप भी आना!' या व्हिडीओला पाहिल्यानंतर एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे की हा शो आता आणखी इंट्रेस्टिंग होणार आहे. करण कुंद्रा(Karan Kundra) ची 'लॉकअप' शो मधील एन्ट्री पाहून त्याच्या चाहत्यांमधील उत्साह मात्र भलताच वाढला आहे. आणि अर्थातच आता या शो विषयीची क्रेझ देखील लोकांमध्ये वाढेल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT