Big Boss 16 Contestant Abdu rozik take eggs for himself,other housemates fight over ration Google
मनोरंजन

Big Boss 16: घरात झाली पहिली चोरी,जेवण कमी पडेल म्हणून अब्दूनं चोरलं अंड; वाचा मजेदार किस्सा

कॅप्टनशीपपासून घरातल्या किराणा सामानापर्यंत सगळेच नियम आता बिग बॉसने बदलले आहेत. घरातल्या सदस्यांना मात्र या नव्या नियमांमुळे मोठी अडचण होतेय.

प्रणाली मोरे

Big Boss 16: बिग बॉस चा खेळ यंदा पूर्णुपणे बदललेला दिसतोय. यावेळी स्पर्धकच नाहीत तर स्वतः बिग बॉस देखील खेळाच्या मैदानात उतरले आहेत. कॅप्टनशीप पासून घरातल्या किराणा सामानापर्यंत सगळेच नियम आता बिग बॉसने बदलले आहेत. घरातल्या सदस्यांना मात्र या नव्या नियमांमुळे मोठी अडचण होतेय. तर तिथं लहानगा (उंचीनं लहान) अब्दू रोझिक घरात धम्माल करताना दिसत आहे.(Big Boss 16 Contestant Abdu rozik take eggs for himself,other housemates fight over ration)

गेल्या भागात बिग बॉसनं घरातल्यांना रोजचं उपयोगी असलेलं किराणा सामान पाठवलं. पण ते पाठवताना बिग बॉसनं घोषणा केलं की यावेळी प्रत्येक स्पर्धकासाठी वेगवेगळं सामान पाठवलं जाईल. पण तरीदेखील घरात खाण्याचं सामान आल्यावर सगळे त्याच्यावर तुटून पडले. प्रत्येकजणं त्यातून आपल्या आवडीची गोष्ट घेण्यासाठी वाद घालताना दिसला.

खाण्या-पिण्याच्या सामानासाठी घरातले जिथे एकमेकांवर भडकताना दिसले, तिथे लहानगा अब्दू रोझिक मात्र आपल्या नटखट अंदाजात चाहत्यांचे मन जिंकताना दिसला. अब्दू घरात किराणाचं सामान आल्यावर आपल्यासाठी अंडी घेतो. जर घरातल्या सगळ्यांना आपल्या खाण्याची चिंता सतावतेय तर अब्दू कसा मागे राहिल बरं. यादरम्यान जेव्हा किराणा मालाचं विभाजन केलं जातं तेव्हा घरातील इतर सदस्य अब्दूला मजे-मजेत चोरी करायला शिकवतात

ते त्याला सांगतात,'तू दुसऱ्याच्या सामाना मधील एखादी गोष्ट चोरू शकतो जर ती तुला हवी असेल तर'. हे सगळं ऐकून अब्दू मग जोशमध्ये येतो आणि हिंमत करत एका स्पर्धकाच्या खोलीतून एक अंड चोरतो. आणि हे पाहून इतर स्पर्धक मात्र त्याच्यावर जोर-जोरात हसू लागतात आणि म्हणतात,'चोरी पण केली ती एका अंड्याची'.

अब्दू रोजिक संदर्भात बोलायचं झालं तर तो बिग बॉसच्या इतिहासातला सर्वात क्युट आणि आकर्षक स्पर्धक ठरतोय. त्याला घरात बागडताना पाहून लोक मात्र एन्जॉय करू लागलेयत. घरवाल्यांसाठी अब्दू एका खेळण्यासारखा झालाय आता. आणि तो देखील आपल्या मिश्किल स्वभावानं घरातल्यांचे मनोरंजन करत आहे.बिग बॉस सुरु झालं तेव्हा पहिल्या दिवशी अब्दू सोशल मीडियावर भलताच ट्रेंड झाला. त्याला लोकांचे भरपूर प्रेम मिळत आहे. त्याचा स्क्रीनवरील वावर लोकांना आवडतोय. पण तो विनर ठरेल का? यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT