Big Boss 16 dia aur baati hum fame actress kanishka soni shocking revelation against sajid khan. Google
मनोरंजन

Sajid Khan: अभिनेत्रीनं साजिद विरोधात थेट व्हिडीओच पोस्ट केलाय, आरोप ऐकाल तर कानावरच हात ठेवाल...

साजिद खाननं सिनेमात काम देतो या नावाखाली अभिनेत्री कनिष्का सोनीला घरी बोलावून तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता.

प्रणाली मोरे

Sajid Khan: बिग बॉस १६ मध्ये जेव्हापासून साजिद खाननं एन्ट्री केली आहे,तेव्हापासून त्याला शो मधून बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली जात आहे. Me Too मोहिमे अंतर्गत साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. बिग बॉसच्या घरात साजिद खानला पाहिल्यावरही अनेक अभिनेत्रींनी त्याला विरोध दर्शवला. आता 'दीया और बाती फेम अभिनेत्री कनिष्का सोनीनं देखील साजिद खान विरोधात मोठा खुलासा केला आहे. (Big Boss 16 dia aur baati hum fame actress kanishka soni shocking revelation against sajid khan).

'दीया और बाती हम' फेम कनिष्का सोनीनं आपल्य इन्स्टाग्राम हॅंडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे,ज्यात तिनं साजिद खानवर तिचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. कनिष्का त्या व्हिडीओत बोलत आहे की,''आता काही दिवस आधीच मीडियात एक मुलाखत दिली होती की एका निर्माता-दिग्दर्शकानं मला त्याच्या घरी बोलावलं आणि मला माझा टॉप वर करुन पोट दाखवायला सांगितलं. तेव्हा मी त्या निर्माता-दिग्दर्शकाचं नाव घेणं टाळलं होतं''.

पण मला आता कळलं आहे की ज्या दिग्दर्शक-निर्मात्यानं माझ्यासोबत ती घाणेरडी वर्तणुक केली होती तो आता बिग बॉसच्या घरात आहे. मला त्याचे नाव खरंतर घ्यायचेच नव्हते. त्याचं नाव घेताना मी खरंतर खूप घाबरली आहे, मला भारतात यायची देखील भीती वाटत आहे. कारण हे लोक खूप पावरफुल आहेत. काहीही करु शकतात. मला नाव देखील घ्यायला भीती वाटत आहे. पण तरीदेखील मी आज बोलेन,कारण तुम्ही त्यांना जी प्रसिद्धि मिळवून दिली आहेत बिग बॉसमध्ये, तेवढी त्याची पात्रताच नाही आणि त्याचं नाव आहे साजिद खान.

कनिष्का म्हणाली''२००८ साली जेव्हा मी दोन रिअॅलिटी शो केले होते,तेव्हा माझी भेट साजिद खानसोबत झाली होती. तेव्हा एवढी कमाई नव्हती माझी, मी सेलिब्रिटींच्या मुलाखती घ्यायचे. तेव्हा मी मुलाखतीसाठी साजिद खानला फोन केला होता. त्यांनी मला साजिद नाडियादवालाच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. बालकनीत बसून मी त्याची मुलाखत घेत होती. तेव्हा मी त्याला म्हणाली होती,मला देखील अभिनयक्षेत्रात काम करायचं आहे. तुम्ही मला काही मदत करू शकता का?'. त्यानंतर त्याने मला त्याच्या घरी बोलावलं . मला सुरुवातीला एकटीला घरी जायला भीती वाटली. पण मग विचार केला अभिनेत्री म्हणून करिअर करायचं आहे तर थोडी रिस्क घ्यावीच लागेल''.

''जेव्हा मी साजिद खानच्या रुममध्ये त्याच्याशी बातचीत करण्यासाठी गेले तेव्हा त्याने मला उभं राहायला सांगितलं. तो माझ्याकडे एका विचित्र नजरेने पाहत म्हणाला,'तुझी फिगर पाहतोय. तुझी फिगर परफेक्ट आहे. मी एक सिनेमा बनवत आहे,ज्यामध्ये दीपिका पदूकोन काम करणार आहे. तुझी फिगरही मुख्य अभिनेत्रीला सूट होईल अशीच आहे'. त्यानं मग मला सांगितलं, 'मला तुझं पोट पहायचं आहे. घाबरु नकोस मी तुला स्पर्श करणार नाही'. मी त्याला हात जोडून सांगितलं,मी तुम्हाला माझं पोट दाखवू शकत नाही. तर मग तो मला म्हणाला,'ठीक आहे,मग मी तुला सिनेमात नाही घेऊ शकत''.

कनिष्का पुढे म्हणाली,'' 'दीया और बाती हम' च्या वेळेस माझी भेट पुन्हा साजिद खानशी झाली. मला वाटलं,आता तरी हा माणूस बदलला असेल. तेव्हा मी पुन्हा त्याच्या गोड बोलण्यावर भाळले अन् सिनेमात काम मागायला पुन्हा त्याच्या घरी गेले. तेव्हा तो म्हणाला,तू खूप साधी मुलगी आहेस. मला माझ्या सिनेमासाठी बोल्ड मुलगी हवी आहे. त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं. तो म्हणाला,मला तुझ्याशी लग्न करायचं आहे कारण तु साधी आहेस. जे मी म्हणेन ते ऐकेल अशी मुलगी आहेस तू''.

कनिष्का पुढे म्हणाली, ''मला सलमान खानकडून अशी अपेक्षा मुळीच नव्हती. मला हे कळत नाही,जे मुलींना मारतात,त्यांचे लैंगिक शोषण करतात अशा लोकांना आपल्या घरात कशी एन्ट्री देतात हे लोक''. साजिद खानचं सत्य जगासमोर आणताना कनिष्का त्या व्हिडीओत खूप भावूक झालेली दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT