Big Boss 16 shocking viral news, archana gautam might thrown out of show for physical violence Google
मनोरंजन

Big Boss 16: अर्ध्या रात्री बिग बॉसच्या घरातून हाकललं अर्चना गौतमला, चर्चेला उधाण...

शिव ठाकरेसोबत भांडताना अर्चना गौतमचं मर्यादा ओलांडणं तिला भारी पडल्याचं बोललं जात आहे.

प्रणाली मोरे

Big Boss 16: : बिग बॉस १६ मधनं एक मोठी बातमी समोर आली आहे,जी ऐकल्यानंतर कदाचित लोकांना धक्का लागेल. रिपोर्ट्सनुसार समोर येत आहे की बिग बॉसने अर्चना गौतमला शो मधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सोशल मीडियावर अर्चनाला घराबाहेर काढण्याची बातमी जोरदार व्हायरल होत आहे. चला जाणून घेऊया नेमकं झालं काय.(Big Boss 16 shocking viral news, archana gautam might thrown out of show for physical violence)

हेही वाचा: बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

साऊथची सनी लियोनी म्हणून चर्चेत आलेली अर्चना गौतम बिग बॉस १६ ची स्पर्धक आहे. शो मध्ये सध्या ती सर्वात जास्त अॅक्टिव्ह सदस्य म्हणून दिसत आहे. पण सध्या तिच्याविषयी समोर आलेल्या बातमीनुसार कळतंय की अर्चनाचं शिव ठाकरेसोबत मोठं भांडण झालं. भांडणा दरम्यान तिचं रागावरचं नियंत्रण सुटलं आणि ती मारामारी करण्यावर उतरली. आणि याच कारणानं बिग बॉसनं तिला घराबाहेरचा रस्ता दाखवला आहे. सोशल मीडियावर तिला घरातून बाहेर काढल्याचं रिपोर्ट्समधनं समोर येत आहे.

रिपोर्ट्समध्ये बोललं जात आहे की, अर्चना आणि शिवचं रात्री जोरदार वाजलं. त्या वादात अर्चना शिवच्या अंगावर धावून गेली आणि मारामारीवर उतरली. तेव्हा अर्ध्या रात्री म्हणजे ३ वाजता तिला बिग बॉसनं घराच्या बाहेर काढलं. पण यामुळे अर्चनाचे चाहते मात्र चिंतेत आहेत. तिला पाठिंबा देताना तिचे चाहते आता तिला 'शो ची राणी' म्हणून संबोधत आहेत.

याव्यितिरिक्त आता बातमी आहे की बिग बॉसच्या घरातून यावेळी दोन जणांना घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. गेल्या आठवड्यात घरामधून कुणीच बाहेर पडलं नव्हतं. म्हणून आता निर्मात्यांनी डबल एविक्शनचा प्लॅन केला आहे. पण यासंदर्भात कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अर्चना गौतमविषयी बोलायचं झालं तर तिला पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात एंटरटेन्मेंट क्वीनचा खिताब देण्यात आला होता. ती शो ची सगळ्यात एंटरटेनिंग सदस्य समजली जायची. सलमानने देखील तिची प्रशंसा केली होती. पण त्यानंतर अर्चनाचा गेम प्लॅन बदलला. तिचं वागणं लोकांना खटकायला लागलं.

गेल्या काही दिवसांपासून अर्चना घरात फक्त इतरांशी भांडताना दिसत आहे. कधी शिवसोबत तर कधी प्रियंकासोबत अर्चनाचे खटके उडताना दिसत आहेत. सुंबुलसोबतचं अर्चनाचं भांडण तर एकदम टोकाचं होतं.

अब्दू रोझिक जेव्हापासून घराचा कॅप्टन बनला आहे तेव्हापासून अर्चना त्याला भिडताना दिसत आहे. अर्चनाला यावरनं काही घरातल्या सदस्यांनी समजावलं पण ऐकेल ती अर्चना कसली. तिचं मात्र अब्दू सोबत पंगे घेणं सुरूच आहे. सध्या तरी बातमी आहे की भांडताना मर्यादा ओलांडल्यानं तिला बिग बॉसनं घराबाहेर काढलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT