Bigg Boss 16 Salman Khan  esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: सलमान खान दाखवणार साजिद खानला घरचा रस्ता !

साजद खानविरोधातील वाद वाढल्याने शोच्या निर्मात्यांनी घेतला निर्णय...

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस हा टिव्हीवरील कंन्ट्रोवर्शियल शो आहे ज्यात अशाच लोकांचा सामावेश असतो. या घरात नेहमी वाद विवाद होतात आणि या वादातुन लोकांचे मनोरंजन होत असते. मात्र यंदाच्या सिझनमध्ये जरा वेगळच चित्र पहायला मिळतंय. बिग बॉस 16 च्या सीझनमध्ये घरात तर वाद होतचं आहे पण त्यापेक्षा जास्त वाद बाहेर झालायं. त्याचं कारण आहे, या शो मधील स्पर्धक साजिद खान . याच वाढत जाणाऱ्या वादामूळे साजिद खानला आता या शोमधून बाहेर जावे लागणार आहे.

त्याने या शोमध्ये एंट्री केली आणि ४ वर्षांपूर्वी त्यांच्यावर लावण्यात आलेले लैंगिक शोषणाच्या आरोपांना पुन्हा उधाण आलं. त्यांचा ‘बिग बॉस’मधील सहभाग अनेकांना आवडला नाही आणि त्यामूळे या शोचे  निर्माते आणि होस्ट सलमान खान यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अनेक नामवंत व्यक्तींनी त्याला या शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांचा रोष आणि साजिदवर होणारे गांभीर आरोप यांच्यामुळे या शोच्या निर्मात्यांवर त्याला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर काढण्यासाठी दबावाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात होते. सर्व बाजूंचा विचार करुन‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी साजिद खानबद्दल हा निर्णय घेतला आहे.त्यामुळे एका  आठवड्याच्या आतच साजिदला शोच्या बाहेर काढले जाऊ शकते महत्वाचे म्हणजे सलमान खानने देखील निर्मात्यांच्या या निर्णयाला सहमती दर्शवल्याचे सांगितले जात आहे

शर्लिन चोप्रा, सोना महापात्रा, उर्फी जावेद, कनिष्का सोनी, देवोलिना भट्टाचार्जी, गौहर खान, सलोनी चोप्रा आणि मंदाना करीमीपर्यंत अनेक अभिनेत्रींनी साजिदला शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली.त्याचबरोबर काही दिवसापूर्वी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांनीही केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना याविषयी पत्राद्वारे साजिद खानचे बिग बॉससारख्या शोमध्ये असणे योग्य नसून त्याला शोमधून बाहेर काढले जाण्याची मागणी केली होती.

साजिद खान बद्दल सांगायच झालं तर  'MeToo' चळवळीदरम्यान साजिदवर जवळपास दहा महिलांनी शोषणाचे गंभीर आरोप केले होते. साजिदने त्यामहिलांकडून अश्लिल मागण्या केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. या आरोपांमध्ये कधी प्रायव्हेट पार्ट दाखवणे, कधी कपडे काढणे, कधी न्यूड फोटो पाठवणे तर कधी महिलांसमोर पॉर्न क्लिप पाहणे अशा गंभीर आरोपांचा सामावेश आहे.त्यानंतर FWICE संस्थेने साजिद खानवर बंदी घातली होती मात्र या संस्थेने त्यांच्या बिग बॉस मधील एंन्ट्रीचे समर्थन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: अशोक खरातला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT