Big Boss Marathi 4: Fight Between Amruta Dhongade And Apurva Nemlekar Google
मनोरंजन

Big Boss Marathi 4: 'एक दिवस तू माझ्या हातात असशील..',अमृताला अपूर्वाचं खुलं आव्हान

बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाल्यापासून सदस्यांमध्ये कडाक्याची भांडणं रंगायला सुरुवात झाली आहे.

प्रणाली मोरे

Big Boss Marathi 4:बिग बॉस मराठीच्या घरात आता हळूहळू टास्कमुळे आणि घरात पार पडणाऱ्या नॉमिनेशन कार्यामुळे सदस्यांची आपापसात जोरदार भांडणं रंगू लागली आहेत. अगदी हाणामारीपर्यंत भांडण पोहोचताना दिसत आहे. घरातून पहिला सदस्य निखिल राजेशिर्के नुकताच बाहेर पडला आहे.

आता दुसऱ्या सदस्याला घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली आहे आणि यावेळेला जोरदार वाद रंगताना दिसत आहेत. आता एकमेकींवर आरोप-प्रत्यारोप करताना अपुर्वा नेमळेकर आणि अमृता धोंगडे मध्ये जोरदार तू-तू,मै- मै रंगली. अमृतानं नॉमिनेशन कार्यात दिलेल्या कारणांमुळे अपुर्वाचा पारा चढला अन् त्यावरनं भलामोठा वाद रंगला.

अमृता अपूर्वाला म्हणाली,'तू मला आठवडाभर दिसली नाहीस,म्हणून मी तुला नॉमिनेट करतेय', त्यावर अपूर्वा म्हणाली,'वैयक्तिक राग इथे काढू नकोस. तुझ्या निकषांनी जर मी चर्चेत नसेल तर मला फरक पडत नाही'. त्यावर अमृतानं पलटवार करत म्हटलं, 'माझ्यावर जे चुकीचे आरोप करताय ते बंद करा...',भडकलेली अपुर्वा पुढे म्हणाली, 'हा गुरुर शेवटपर्यंत राहू दे अमृता...आज माझी बाजू तुझ्याकडे होती ना,एक दिवस तू माझ्या हातात असशील,लक्षात ठेव'.

अजून कोणाकोणामध्ये झाले वाद ? कोणी केले कोणाला नॉमिनेट ? हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT