Bigg Boss Marathi 4: ‘Social as much as social’ weekly task will be played in the house! Google
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: कहर झाला! खेळासाठी एकमेकांची डोकी भादरली...

“सोसल तितकंच सोशल” या घरात रंगलेल्या साप्ताहिक कार्यादरम्यान जो टास्क खेळला गेलाय त्यामुळे प्रसाद आणि विकासवर टक्कल करण्याची वेळ आलीय.

प्रणाली मोरे

Big Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोणते सदस्य नॉमिनेट होणार हे आजच्या भागात कळेलच. पण आज घरामध्ये सदस्यांना गमवाव्या लागणार आहेत त्यांच्या काही मौल्यवान वस्तू... कारण घरात रंगणार आहे “सोसल तितकंच सोशल” - साप्ताहिक कार्य ! या टास्कमध्ये सदस्यांची कसोटी लागते कारण पणाला लागतात त्यांच्या काही महत्वाच्या गोष्टी. आता टीम्स सदस्यांना कोणत्या गोष्टींचे बलिदान द्यायला सांगणार हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण सदस्य ते करण्यास तयार होतील का? हा देखील मोठा प्रश्न आहे. #CHALLENGE सदस्य कसे पूर्ण करतील ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.(Bigg Boss Marathi 4: ‘Social as much as social’ weekly task will be played in the house!)

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तेजस्विनी आणि अपूर्वा कोणतातरी पदार्थ खाताना दिसतं आहे आणि तो काही तितकासा स्वादिष्ट नसणार हे आपल्याला त्यांच्या एक्सप्रेशनवरनं प्रोमोतून कळेलंच. तर अक्षय रोहितला सांगताना दिसणार आहे रुचिराचा फोटो फाड आणि बॉटल आहे ती नष्ट कर. तर दुसरीकडे स्नेहलता सदस्यांचे कपडे फाडताना आणि हेअर ड्रायर नष्ट करताना दिसत आहे.

विकास आणि प्रसादला अक्षयने खूप मोठं #CHALLENGE दिले - त्याचे म्हणणे आहे डोक्यावर ट्रीमर फिरवून दाखवा... विकास - प्रसाद ते करताना दिसत आहेत... प्रसाद हे करताना नाखूष असला तरी त्याने हे CHALLENGE स्वीकारले आहे... बघूया टास्कमध्ये पुढे काय काय होणार ? सदस्यांच्या कोणकोणत्या गोष्टी पणाला लागणार आजच्या भागामध्ये.

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठी वाहिनीवर आणि कधीही VOOT वर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT