Big Boss Marathi 4,New Controversy at home, Yashashree, Apurva, Megha Chatting about cleanliness of home Google
मनोरंजन

Big Boss Marathi 4: कोण आहे घरातला 'तो' सदस्य ज्याला स्वच्छतेवरनं केलं जातंय टार्गेट...

बिग बॉस मराठीच्या घरात यशश्री,मेघा आणि अपुर्वा यांच्यात घरातील स्वच्छतेवरनं सुरु असलेली चर्चा पुढे जाऊन वादाचं रुप धारण करेल असं दिसत आहे.

प्रणाली मोरे

Big Boss Marathi 4: बिग बॉस मराठीचा चौथा सिझन सुरु होऊन काहीच दिवस लोटले असले तरी आता रोज एक नवीन मुद्दा कुठुनतरी उठतो आणि पुढे त्याला वादाचं रुप मिळताना दिसत आहे. आता एका घरात इतके लोक तेही वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले, आधी फारसे न भेटलेले, आणि भेटूनही न बोललेले असे सगळेच एकत्र आले की थोडं भांड्याला भांडे लागणारंच नाही का.

मग अनेक मुद्दे असतात अगदी तुमच्या-आमच्या घरात असतात तसेच बरं का, भांडी कोणी घासायची,कपडे कुणी धुवायचे, बाथरुम कुणी स्वच्छ करायचं,कचरा कुणी काढायचा ते थेट जेवण कुणी करायचं. बिग बॉसच्या घरात सगळं ठरवलं गेलं असूनही यावरनं वाद होतातच.

आता स्वच्छतेवरनं मेघा आणि तिची गॅंग घरातील कोणत्यातरी सदस्यावर आगपखड करताना दिसत आहेत. (Big Boss Marathi 4,New Controversy at home, Yashashree, Apurva, Megha Chatting about cleanliness of home)

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये यशश्री, अपूर्वा आणि मेघा मध्ये सुरु आहे स्वच्छता आणि घर कामावरून चर्चा. यशश्री या चर्चेत कोणा एका सदस्यावर खूपच वैतागली असून तिचे म्हणणे आहे, "एकच गोष्ट कितीवेळा सांगायची ही काही शाळा आहे का? मग तसं सांगा मी शाळा उघडते. ओला कचरा, सुका कचरा दोन डब्बे आहेत हे लक्षात ठेवायला किती त्रास होतो ? 

मेघाचे पण म्हणणे पडले,'एकाच दिवसांत त्याने इतक्या वेळा विचारलं...', यशश्रीचे म्हणणे आहे, "ते जाऊदे चमचे दररोज ठेवायची जागा माहिती आहे ना, तरी विचारणार सारखं हे कुठे ठेऊ, ते कुठे ठेऊ ? माहिती आहे ना जागा मग ? तुझ्याबरोबर बसू का तिकडे शिकवायला ? जर गोष्टी चुकल्या तर आपण बोलणार ना ? त्याला आत्मविश्वासच नाहीये". आणि ही चर्चा सुरूच राहिली ... बघुया या तिघी कोणाबद्दल बोलत आहेत ते आजच्या भागामध्ये.

तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT