rubina dilaik rahul vaidya
rubina dilaik rahul vaidya 
मनोरंजन

Big Boss 14 - रुबिना, राहुलची हाऊस पार्टी; 'पावरी' व्हिडीओ केला शेअर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बिग बॅास सिझन 14 च्या ग्रॅंड फिनाले नंतर बिग बॉसमधील सदस्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत हाऊस पार्टी केली. राहूल वैद्य,  रुबिना दिलेक या सदस्यांचे त्यांच्या कुटुंबाने घरात जंगी स्वागत केले. या पार्टीचे व्हिडीओ आणि फोटो रूबिना आणि राहूलने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

रूबिना दिलेक ही बिग बॉस सिझन 14 ची विजेती ठरली. बिग बॉस शो जिंकून आल्यानंतर रूबिनाच्या कुटुंबाने तिच्यासाठी वेलकम पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीमध्ये रूबिना व्हाईट शॉर्ट पॅंन्ट आणि  ब्लॅक टीशर्ट अशा कूल लूकमध्ये रुबिना दिसते. रूबिनाने यावेळी बिग बॅसची ट्रॉफी घेऊन फोटो काढले. रूबिनाच्या कुटुंबाने घर फुग्यांनी सजवले होते. 'बॉस अॅंड बॉस लेडी' असे फुग्यांनी लिहीले होते. रूबीनासाठी बिग बॉसच्या ट्रॉफीसारखा केक तयार केला होता. अभिनेता शरद केळकरनेसुद्धा पार्टीला हजेरी लावली होती.

बिग बॉस 14 मधील टॉप टूमध्ये आलेला सदस्य राहूल वैद्यने देखील त्याच्या कुटुंबासोबत पार्टी केली. बिग बॉसमुळे बरेच दिवस कुटुंबापासून आणि त्याची प्रेयसी दिशा परमारपासून राहूल लांब राहिला होता. पार्टीमधील फोटो सोशल मिडीयावर शेअर करून राहूलने 'बॅक टू माय डायरेक्शन, मेरी दिशा' असे कॅप्शन दिले आहे. यावेळी  दिशा परमार सोबत रोमॅंटीक पोज देऊन काढलेले फोटो राहूलने सोशल मिडीयावर शेअर केले.
हेही वाचा : दिव्या भारतीने जाता जाता या अभिनेत्रीला केलं स्टार

पार्टीमधील एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या प्रसिद्ध असलेला पावरी व्हिडीओसारखा व्हिडीओ राहूलने त्याच्या मित्र मैत्रिणींसोबत तयार केला. बिग बॉसमध्ये असताना राहूलने दिशाला लग्नासाठी प्रपोज केले होते. दिशाने बिग बॉसच्या घरामध्ये येऊन आपला होकार कळवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT