Bigg Boss 11 fame Hina Khan hospitalised Esakal
मनोरंजन

Hina Khan hospitalised: बिग बॉस फेम अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये दाखल! चाहते पडले काळजीत

Bigg Boss 11 fame Hina Khan hospitalised: हिनाने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर करत तिच्या तब्येतीची अपडेट दिली आहे.

Vaishali Patil

Bigg Boss 11 fame Hina Khan hospitalised: टिव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान ही नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या व्यावसायिक कारणामुळे तर कधी वैयक्तिक कारणामुळे. मात्र आता हिना खानच्या चाहत्यांसाठी एक काळजीत टाकणारी बातमी समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून हिनाची प्रकृती ठिक नसल्याने तिला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता हिनाने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर करत तिच्या तब्येतीची अपडेट दिली आहे.

हिना खानने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. हिना खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक सेल्फी शेअर केला आहे. या फोटोत ती हॉस्पिटलचा ड्रेस घालून मिरर सेल्फी घेताना दिसली होती.

हिनाने मिरर सेल्फी शेअर करताना हिना खानने लिहिले की, "तुम्ही कुठे आहात आणि या क्षणी तुमच्या मनात काय चालले आहे हे महत्त्वाचे नाही. तुम्हाला कुठेतरी आरसा दिसला तर आरशात सेल्फी घ्यायला विसरू नका."

Hina Khan hospitalised:

मात्र या पोस्टमध्ये हिनाने तिला रुग्णालयात का दाखल करावे लागले, हे अद्याप सांगितलेले नाही. मात्र तिच्या चाहत्यांना आता तिची काळजी लागली आहे. ते हिनाच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.

हिना खान बद्दल बोलायचं झालं तर ती एक दशकाहून अधिक काळ टीव्ही इंडस्ट्रीत काम करत आहेय. ती अभिनयाच्या जोरावर चाहत्याच्या मनावर राज्य करते. हिनाला ये रिश्ता क्या कहलाता है मधुन खरी ओळख मिळाली.

या मालिकेत तिने अक्षराची भुमिका साकारली होती. आजही कित्येक चाहते तिला अक्षरा नावानेच ओळखतात. त्यानंतर ती बिग बॉसच्या घरातही झळकली होती. आता हिनाने चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला आहे. आता ती 'कंट्री ऑफ ब्लाइंड ' हा चित्रपटात झळकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT