Mehjabi Siddiqui(Big boss 11) google
मनोरंजन

बिग बॉसमधल्या अभिनेत्रीनं धर्मासाठी सोडलं बॉलीवूड, हिजाबचं समर्थन

'बिग बॉस ११' मध्ये दिसलेली महजबी सिद्दिकी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ही घोषणा केली.

प्रणाली मोरे

हिजाब (Hijab) वरुन सुरू असलेला वाद आता संपूर्ण देशात पेटून उठला आहे. कर्नाटक मधील शिवमोंगा इथनं सुरू झालेला हा वाद आता राज्या-राज्यात आपलं डोकं वर काढीत आहे. आता तर बॉलीवूड(Bollywood) मध्येही याचे पडसाद उमटले आहेत. 'बिग बॉस ११' मध्ये दिसलेली महजबी सिद्दिकी(Mehjabi Siddiqui) हिनं तर एक घोषणा करून सगळ्यांना चकीत करून सोडलं आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट करीत म्हटलं आहे की,''मी ईस्लाम धर्मासाठी बॉलीवूडला सोडत आहे. मी हिजाबचं समर्थन करीत आहे. मी अल्लाहच्या मार्गावर यापुढे चालेन''. असंही तिनं त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महजबी सिद्दिकीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे,''मी हे यासाठी लिहित आहे कारण दोन वर्षांपासून मी खूप टेन्शनमध्ये होती,मला काहीच समजत नव्हतं की मी असं काय करू,ज्यामुळे मला शांती मिळेल...देवाच्या विरोधात जाऊन कधीच कोणी माणूस सुखी राहू शकला नाही. तुम्ही लोकांना खूश ठेवण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी ते कधी मनापासून खूश नाही राहू शकत. यापेक्षा तर आपल्या वागण्यानं देवाला आनंद मिळेल अशी गोष्ट करणं कधीही उत्तम. मी सना खानला एक वर्षापासून सोशल मीडियावर फॉलो करत आहे. मी तिनं आत्मसात केलेल्या विचारांनाही फॉलो करत आहे. आणि तसं केल्यामुळे मला आनंद,समाधान मिळत आहे,देव मला अशाच सन्मार्गावर चालत राहण्याची सदबुद्धी देवो.''

महजबी सिद्दिकीच्या आधी सना खान आणि जायरा वसीम यांनी ईस्लाम धर्मासाठी ग्लॅमर वर्ल्डपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला होता. कधीकाळी बोल्ड ड्रेसेसमध्ये दिसणारी सना आता आपल्याला हिजाब मध्ये दिसते. ती नेहमी हिजाब मधील पेहरावासोबतच आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. तर जायरा वसीमचं म्हणणं आहे की,''ईस्लाम धर्मात हिजाब स्त्रियांसाठी चॉइस नाही तर ड्युटी आहे''. आता ही सारी वक्तव्य अशावेळेस समोर येत आहेत जेव्हा पूर्ण देशात हिजाब वरुन सुरू असलेला वाद कळीचा मुद्दा बनत चालला आहे. आता हे प्रकरण कोर्टात पोहोचलंय. त्यामुळे या नवनवीन घोषणा हा वाद आणखीनच चिघळवत आहेत,असंच चित्र दिसतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Development : पुण्याच्या प्रश्नांचा विधानसभेत आवाज, आमदारांकडून उपाययोजनांची मागणी; वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे हटवावीत

Ashadhi Wari 2025: 'जो तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात'; आधुनिक वाद्यांसह भारुडकार कृष्णा महाराज यांची भारुडसेवा

Gadchiroli Education: गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण; बोगस शिक्षक पराग पुडकेचा प्रस्ताव केला होता मंजूर

ख्रिश्चन आक्रमक! आमदार पडळकरांचे ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Pune News : आपत्तींमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ; लष्करी अभियंत्यांच्या कामगिरीचेही कौतुक

SCROLL FOR NEXT