Bigg Boss 14: Arshi Khan gets into a verbal spat with Rahul Vaidya asks him to respect women 
मनोरंजन

Bigg Boss 14: राहुल, महिलांची इज्जत करायला शिक,अर्शीनं झापडलं

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बिग बॉस शो कमालीचा लोकप्रिय होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी सावंतनं प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले असून आता या मालिकेत वाद समोर येताना दिसत आहे. बिग बॉस हा रियॅलिटी शो वाद, भांडणं यासाठी प्रसिध्द आहे. स्पर्धेच्या दरम्यान अनेकजण मित्र बनवतात. ती मैत्री काही काळ टिकते तर त्यातून कडाक्याची भांडणे होत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी एजाज खान आणि त्याच्या सह स्पर्धकांमधील वाद सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता एजाज खान या स्पर्धेत नाही. मात्र त्याचा मित्र राहुल वैद्य आणि अर्शी खान यांच्यातील वाद सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. तो एवढा टोकाला गेला की नंतर अर्शीनं राहुलला त्यावरुन सुनावले.

विशेष म्हणजे राहूल आणि अर्शी हे चांगले मित्र होते. मात्र आता त्यांच्यात पूर्वीसारखी मैत्री राहिलेली नाही. त्यांच्यात झालेली भांडणे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा विषय झाला आहे. मेकर्सनं त्या व्हिडिओचा प्रोमो शेयर केला आहे. त्यात राहूल आणि अर्शीची भांडणे चालली आहेत असे पाहायला मिळते. त्या व्हिडिओमध्ये राहूल आणि अर्शी किचन मध्ये दिसत असून राहूल राखीशी बोलत आहे. तो तिला म्हणतो, जगात सगळं काही निगेटिव्ह सुरु आहे असे सगळे म्हणतील. मात्र निगेटिव्ह काही बोलणार नाही. राखी तु काही अर्शी खान होऊ नकोस. तेव्हा राखी राहूलला एक स्माईल देते. अर्शीला राहूलची ती गोष्ट आवडत नाही. ती त्याला म्हणते, आता तु जे काही विधान केलं ते माझ्यावर होते. त्यानंतर राहूलने अर्शीची फिरकी घेतली जी तिला आवडली नाही.

चिडलेल्या अर्शीनं राहूलला परखड शब्दांत सुनावले ती त्याला म्हणाली, तु महिलांची इज्जत करायला शिक. त्यावर राहूल तिला म्हणतो की तु स्लिप्ट पर्सनॅलिटी आहेस. त्या दोघांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, राहूलनं अर्शीवर तिखट शब्दांनी केली टिप्पणी. त्यांच्यातील वाद कमी होणार की वाढणार, अर्शीनं कॅप्टन्सीच्या एका टास्कमध्ये राहूलला सोडून विकास गुप्ताला सपोर्ट केलं होतं. त्यामुळे राहूल तिच्यावर नाराज होता. त्यानंतर राहूल आणि अली गोनीनं अर्शी बरोबरची मैत्री सोडली होती.  
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB चा फलंदाज Unstoppable ! १४ चेंडूंत ६४ धावा कुटून संघाला मिळवून दिला दणदणीत विजय; KKR ला होतोय पश्चाताप

Latest Maharashtra News Updates : बदलापुरात गावगुंडांकडून पोळी भाजी केंद्राची तोडफोड

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर डबल बेड मॅट्रेस अन् सोफ्यासह दुरुस्तीचा खर्च तब्बल ४० लाख; इतकी उधळपट्टी कशाला? विरोधकांचा सवाल

Gemini Photo Trend : गुगल जेमिनीवर तुम्ही फोटो बनवताय, पण त्या फोटोचे पुढे काय होते? खरंच यामुळे डेटा लिक होतो का..जाणून घ्या सत्य

Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

SCROLL FOR NEXT