Jasmin Bhasin Hospitalized Esakal
मनोरंजन

Jasmin Bhasin Hospitalized: बिग बॉस फेम जस्मिन रुग्णालयात दाखल! प्रकृती चिंताजनक

Vaishali Patil

Jasmin Bhasin Hospitalized: लोकप्रिय अभिनेत्री जास्मिन भसीन ही नेहमी चर्चेत असते. जास्मिन भसीनच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. जस्मिन भसीनची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जास्मिनने स्वत: एक फोटो पोस्ट करत ही माहीती चाहत्यांना दिली आहे.

जास्मिनला पोटाचे इन्फेक्शन झाल्याची माहीती तिने दिली आहे. या बातमीनंतर जास्मिनचे चाहते आता चिंतेत पडले आहे. तिची तब्येत आता कशी आहे याबद्दल ते विचारणा करत आहे. मात्र जास्मिनने याबाबात काही माहिती दिलेली नाही.

जस्मिनने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. त्यावर तिने लिहिले - पोटात इन्फेक्शनची समस्या..." असं लिहिलं आहे. ही गोष्ट पाहताच चाहते जस्मिन लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

तिने तिच्या हाताचा एक फोटो शेअर केला तिच्या हातावर कॅन्युला ठेवण्यात आली होती. जस्मिनला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

जस्मिन भसीन बद्दल बोलायचं झालं त ती अली गोनीला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे. या दोघांची जोडी 'बिग बॉस 14' च्या घरात जमली होती.

जस्मिन आणि अली हे दोघे नुकतेच 'सावन आ गया' या गाण्यात चमकले होते. जास्मिन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. जस्मिनचे यूट्यूब ब्लॉगही खुप लोकप्रिय आहेत.

तर दुसरीकडे अभिनेत्री शेहनाज गील देखील हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. शेहनाजने तिचा हॉस्पिटलमधून व्हिडिओ शेयर करत तिच्या फॅन्सना ही बातमी दिली आहे. शेहनाजला पोटाचा संसर्ग झाल्याने तिला अचानक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. आता ती बरी असल्याचे शेहनाजने चाहत्यांना सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT