Bigg Boss 14 grand finale, Rubina Dilaik winner, Rubina Dilaik lift Bigg Boss 14 trophy 
मनोरंजन

Bigg Boss 14 Grand Finale : रूबीना ठरली बिग बॉस 14 ची विजेती

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम

मुंबई - बिग बॉसच्या 14 व्या सीझनच्या अंतिम स्पर्धेतील विजेता कोण असणार यावर आता  शिक्कामोर्तब झाले आहे. रुबिना दिलेर ही 14 व्या बिग बॉस स्पर्धची विजेती ठरली आहे. तर राहूल वैद्यला  2 ऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. निकालापूर्वीच चाहत्यांनी सोशल मीडियावर यंदाच्या सीझनमधील विजेत्याची नाव घोषित करुन टाकले होते. त्यातही रुबीना दिलेर हीच विजयी होणार असल्याची शक्यता तिच्या चाहत्यांनी व्य़क्त केली होती. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर तिनं आपल्याला मिळालेल्या वोटिंग पोलची माहिती शेअर केली होती. रुबिनाच्या विजयामुळे यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

बिग बॉसच्या अंतिम फेरीमध्ये रूबीनानं बाजी मारली आहे असं सांगणाऱ्या पोलनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रूबीनाला ज्याच्याकडून कडवे आव्हान होते असा एक स्पर्धक होता  तो म्हणजे राहूल वैद्य. त्याच्या आणि तिच्या पॉइंटमध्ये केवळ तीन टक्क्यांचा फरक होता.  बिग बॉस चा सूत्रसंचालक सलमानने रात्री उशिरा निकाल जाहीर केला. ओडियन्स पोल मध्ये  रूबीनाचं नाव अग्रक्रमांकावर होत.  सध्य़ाच्या घडीला संभाव्य विजेती म्हणून रुबीनाला सर्वाधिक पसंती मिळताना दिसत होती.

बिग बॉसच्या चाहत्यांकडूनही रूबीनाला पसंती मिळाली.   एकवेळ राखीच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र ती या स्पर्धेत मागे पडली. आतापर्यत वेगवेगळे ओपिनयन पोल घेण्य़ात आले होते. त्यात रूबीनाचे नाव पहिल्या क्रमांकावर होतं.बाकीच्या स्पर्धकांच्या तुलनेत रुबीना कित्येक पावले पुढे होती. मात्र फायनल विनर कोण असणार हे सलमानने जाहीर केले. त्या नावासाठी प्रेक्षकांना आणखी काही वेळ प्रतिक्षा करावी लागली. 

अंतिम फेरी मध्ये अली गोनी, राखी सावंत, निक्की तांबोळी, राहूल वैद्य आणि रूबीना दिलेक यांचा समावेश होता.  सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबीनाची जिंकण्याची शक्यता वर्तवली होती. रुबीनाला आतापर्यत 35 टक्के प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. तर राहूलला 34.5 टक्के प्रेक्षकांनी वोटिंग केले होते. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं कोण जिंकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरले. राहूल वैद्य आणि अली गोनीनं मध्ये काट्याची टक्कर होती. तर राखी सावंत आणि निक्की तांबोळी शेवटच्या स्थानावर होते. 

रूबीना ही एक टेलिव्हिजन क्षेत्रात काम करणारी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचा फॉलोअर्सही मोठा आहे. तिनं छोटी बहु या मालिकेपासून सुरुवात केली. मात्र त्यातून ती लोकप्रिय झाली. त्यानंतर शक्ति मधील तिनं साकारलेली किन्नराची भूमिकाही गाजली. 33 वर्षीय रूबीना ही मुळची शिमला  येथे राहणारी आहे. तिला आयएएस व्हायचं होतं. 2008 मध्ये चंदीगढमध्ये छोटी बहुचे ऑडिशन सुरु होते. तेव्हा तिनं त्यात भाग घेतला होता. त्यानंतर तिचं आयुष्यच बदलून गेलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT