bigg boss 14  
मनोरंजन

'तू आठवड्याला 5 लाख रुपये देतो', जॅस्मिनचा राहुलवर आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बिग बॅास सिझन 14 हा शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातल्या सगळ्याच सदस्यांनी कंबर कसली आहे. घरात होणाऱ्या वादामध्ये किंवा देण्यात येणाऱ्या टास्कमध्ये प्रत्येकजण जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यंदाच्या बिग बॉसमध्ये राहूल वैद्य, रूबिना दिलाईक, राखी सावंत,अली गोनी, निक्की तंबोळी, एजाज खान हे फायनलिस्ट आहेत. काही दिवसांपूर्वी एजाज खान त्याच्या चित्रपटाच्या शुटींसाठी घराबाहेर गेला होता. तेव्हा त्याच्यावतीने घरामध्ये हिंदी मालिकांमधील अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यला संधी दिली गेली. 

फायनलिस्टमध्ये खेळाची रंगत वाढली असतानाच काही दिवसांपूर्वी बिग बॅासच्या घरात फायनलिस्टचे सपोर्टर म्हणून त्यांच्या खास व्यक्ती आल्या आहेत. जॅस्मिन भसीन, परास छाबरा, बिंदु दारा सिंग, राहुल महाजन आणि तोषी सबरी  हे फायनलिस्टचे सपोर्टर म्हणून बिग बॅासच्या घरात आले आहेत. अली गोनीची सपोर्टर म्हणून आलेल्या जैस्मिन भसीनने नुकताच राहुल वैद्यवर एक मोठा आरोप केला आहे. 

बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी सोशल मिडीयावर ट्रेंण्डमध्ये आसणे गरजेचे असते. ट्रेंण्डिंगमध्ये असल्यामुळेच खेळाडूंना जास्त मत मिळण्यास मदत होते.  रूबिना दिलाईक, राहूल वैद्य आणि अली गोनी हे नेहमी सोशल मिडीयावर ट्रेंण्डिंगमध्ये असतात.

सोशल मिडीया ट्रेंण्डमुळे कोणत्या खेळाडूला जास्त लोकप्रियता मिळत आहे हे लक्षात येते. या सोशल मिडीया ट्रेंण्डसाठी राहुल वैद्य पैसे देत आहे असा आरोप नुकताच जॅस्मिनने केला आहे. पारस छाबरा आणि जास्मीन या पेड सोशल मिडीया ट्रेंण्डबद्दल बोलत होते. 'मैने सुना की तु ५ लाख हफ्ते के भरता है'असं जास्मीन म्हणाली .सोशल मीडियावर राहुलच्या ट्रेंडने जवळपास 5 मिलीयन ट्वीटचा टप्पा पार केला आहे. आता या अरोपाला राहुल कसा उत्तर देईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 3rd ODI: न्यूझीलंडने पहिल्यांदा भेदला भारताचा अभेद्य किल्ला! इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल, विराट कोहलीचं शतक व्यर्थ

ZP Election Mangalwedha : नगरपालिका पराभवानंतर भाजपची सावध खेळी; जिल्हा परिषदेसाठी आवताडे–परिचारक गटात समझोता?

IND vs NZ 3rd ODI: 'चेस मास्टर' विराट कोहली लढला अन् विश्वविक्रमी सेंच्युरीही ठोकली; मालिका विजयासाठी भारताच्या आशा जिवंत

Mumbai Firing Incident : मोठी बातमी! मुंबईत गोळीबाराची घटना, सोसायटीवर फायरींग करत आरोपी फरार

Pune Political Shift : शरद बुट्टेपाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार; उत्तर पुण्यात भाजपला मोठा धक्का!

SCROLL FOR NEXT