bigg boss 14 promo rakhi Sawant writes email to god here video viral on social media
bigg boss 14 promo rakhi Sawant writes email to god here video viral on social media  
मनोरंजन

'देवा मी तुम्हाला मेल केला आहे, तो वाचून मला जिंकून द्या'

युगंधर ताजणे

मुंबई - बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी मिळवण्यात अभिनेत्री राखी सावंत यशस्वी झाली आहे. तिनं वेगवेगळ्या करामती करुन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. यंदाच्या बिग बॉसमध्ये सर्वाधिक मनोरंजन करणारी स्पर्धक कोण असे म्हटले तर राखीचे नाव घ्यावे लागेल. अभिनव शुक्लाला प्रपोज करण्यासाठी राखीनं केलेल्या करामती सर्वांना माहिती आहे. तसेच इतर सहका-यांशी तिची झालेली भांडणे आणि त्यामुळे तिच्यावर झालेली टीका यामुळे तिचा फॉलोअर्स वाढण्यात मदत झाली आहे.

राखी आता बिग बॉसच्या फायनल मध्ये पोहचली आहे. कलर्स वाहिनीच्या वतीनं एक प्रोमो रिलीज झाला आहे. त्यात राखीनं सर्वांना हसवलं आहे. राखीनं त्या व्हिडिओमध्ये कमालच केली आहे. ती बिग बॉसच्या घरात बसली आहे. त्यावेळी तिनं चक्क देवाशी बोलण्यास सुरुवात केली आहे. ती म्हणते, हे परमेश्वरा, मला फायनल स्टेजवर पोहचवा आणि सेकंड रनर अप बनवा. बाकी कोणी का जिंकू देत. पण मलाही विजयी करा अशी याचना तिनं देवाजवळ केली आहे. यावरुन राखी जिंकण्यासाठी किती उतावीळ झाली आहे हे कळते.

तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते देवा, कुणाला काहीही न सांगता बॅग घेऊन तुम्ही मागच्या दारानं निघून गेला असतात का, नाही ना, देवा मला रनर अप पर्यत पोहचवा. आता पाच लोकं राहिली आहेत. एक विनर आणि एक रनर अप ठीक आहे ना, असे होईल ना? अशाप्रकारे राखीनं इ मेल टाईप करते. तो तिला देवाला पाठवायचा आहे. ती सांगते की हे देवा मला आता मदत करा. काही करुन मला फायनलरपर्यत तर आणले आहे तेव्हा त्यापुढचा प्रवासही सोपा करा. अशी मागणी राखीनं देवाकडे केली आहे.

राखी म्हणाली, देवा आतापर्यत तुम्ही माझी मोठी मदत केली आहे. आता तर देशातील लोकंही माझ्या पाठीशी आहे. अशावेळी तुम्ही अजून थोडी मदत केल्यास बरे होईल. मला आशा आहे की तुम्हाला माझा मेल मिळाला असेल. मी तुम्हाला मेल केला आहे. तुम्ही माझा मेल वाचा. राखीच्या अशाप्रकारच्या करामतीनं प्रेक्षकांचे मात्र चांगलेच मनोरंजन केले आहे. 
 

 
 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT