bigg boss 14 
मनोरंजन

'बिग बॉस १४'मध्ये पहिल्यांदाच होणार 'हा' मोठा बदल तर शोमध्ये 'लॉकडाऊन' कनेक्शनही दिसणार!

दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- छोट्या पडद्यावरचा सगळ्यात मोठा रिऍलिटी शो 'बिग बॉस १४'ची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. केवळ शोची उत्सुकता नाही तर शोची थीम काय असणार कोणचे स्पर्धक असणार याचीही उत्सुकता आहे. मात्र यावेळी बिग बॉसच्या फॉरमॅटमध्ये खूप मोठा बदल होणार असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान 'बिग बॉस १४' मध्ये लॉकडाऊन कनेक्शन देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

मिडिया रिपोर्ट्सनुसार, 'बिग बॉस'च्या आगामी १४ व्या सिझनमध्ये याआधी कधीही न झालेला मोठा बदल पाहायला मिळणार आहे. सगळ्यात आधी शोच्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल पाहायला मिळेल. याचं लॉकडाऊनसोबत कनेक्शन देखील असू शकतं. निर्माते या शोसाठी खास असा फॉरमॅट बनवण्याचा विचार करत आहेत जो सध्याच्या कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीने प्रेरित असेल.

'बिग बॉस'च्या आगामी सिझनमध्ये लॉकडाऊन हा खूप मोठा हायलाईट असणार असल्याचं कळतंय. ज्यामध्ये सोशल डिस्टंन्सिंग या नियमाची देखील महत्वाची भूमिका असेल. 'बिग बॉस १४' च्या सीझनची टॅगलाईन 'बिग बॉस १४: लॉकडाऊन एडिशन' अशी असण्याची दाट शक्यता आहे.

कोरोनामुळे शोच्या निर्मात्यांना नवीन नियम देखील बनवावे लागणार आहेत. इतकंच नाही सगळ्यात मोठा बदल म्हणजे आत्तापर्यंत घरातील स्पर्धकांना बाहेरच्या जगाशी बोलण्याची परवानगी नव्हती. मात्र यावेळी शोमध्ये मोठा ट्विस्ट दिसणार असल्याचं कळतंय. असं देखील म्हटलं जातंय की 'बिग बॉस'च्या घरात स्पर्धकांना मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी असेल. ते बाहेरच्या जगाशी संपर्क साधू शकतात. स्पर्धकांना काही इलेक्ट्रॉनिक वस्तु देखील दिल्या जाणार आहेत जेणेकरुन ते व्लॉग्स आणि व्हिडिओ मेसेज त्यांच्या जवळच्या व्यक्तींना पाठवू  शकतील.

असो.. जर ही बाब खरी झाली तर 'बिग बॉस'च्या इतिहासात पहिल्यांदाच असं पाहायला मिळेल. यावर्षी 'बिग बॉस १४' थोडं उशीरा सुरु होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'बिग बॉस १४' हा शो ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत सुरु होऊ शकतो. या शोमध्ये येण्याआधी १६ स्पर्धकांची कोरोना टेस्ट देखील केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.   

bigg boss 14 salman khan show new session will have different theme and format lockdown connection  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT