bigg boss 14 
मनोरंजन

बिग बॉस १४: लवकरंच होणार नवीन स्पर्धकांची घरात एंट्री, स्पर्धकांना केलं गेलं क्वारंटाईन

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- छोट्या पडद्यावरिल सगळ्यात जास्त चर्चेत असलेला शो म्हणजे 'बिग बॉस'. बिग बॉसच्या यंदाचा १४ वा सिझन देखील आता हळुहळु प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करायला लागला आहे. तुफानी सिनिअर्स म्हणजेच सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान देखील शो जास्त मनोरंजक बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. टास्क दरम्यानची मस्ती आणि भांडणं यामध्ये आता एक नवीन बातमी येतेय जी बिग बॉसच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवणार आहे. शोमध्ये आत्ता ११ नवीन स्पर्धक आणि तीन तुफानी सिनिअर्स आहेत. मात्र यात आणखी थोडा तडका देण्यासाठी निर्माते आता ४ नवीन स्पर्धकांची एंट्री करणार आहेत.

'बिग बॉस १४' मध्ये येणारे दिवस आणखीन मनोरंजक होणार आहेत. दोन आठवड्यांनंतर शोमध्ये तुफानी सिनिअर्स स्पर्धकांना सांगितलं जाईल की त्यांची आता घरातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे मात्र हे खरं तर असं नसेल. तसंच 'बिग बॉस'चं घर आणखी चर्चेत राहण्यासाठी निर्माते ४ नवीन स्पर्धकांची घरात एंट्री करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसचे हे चारही नवीन स्पर्धक सध्या क्वारंटाईन आहेत. 

या चार स्पर्धकांमध्ये शार्दुल पंडित, रश्मि गुप्ता, नैना सिंह यहे कन्फर्म असल्याचं कळतंय. तर चौथ्या स्पर्धकाच्या बाबतीत असा अंदाज लावला जातोय की तो पवित्रा पुनियाचा एक्स बॉयफ्रेंड प्रतीक शहजपाल असू शकतो.

दोन आठवड्यांनंतर जेव्हा सिनिअर्स शो सोडून जातील तेव्हा हा शो किती मनोरंजक होतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. सोबतंच सिद्धार्थ, हिना, गोहर घरातून बाहेर आल्यानंतर शेहनाज, गौतम गुलाटी आणि प्रिंस नरुला यांची एंट्री होणार आहे.   

bigg boss 14 soon 4 new contestants will enter in bb house  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT