Bigg Boss 16  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: दोस्ती! अब्दू बिग बॉसच्या बाहेर..शिवला अश्रू अनावर

Vaishali Patil

बिग बॉस16 सिझन हा चांगलाच रंगात आला आहे. या शोमध्ये आपण सगळंच पाहिलं मग ते वाद असो भांडण असो किंवा प्रेम आणि दोस्ती.. घरात शिव आणि त्याची मंडली ही तर सर्वांची आवडती आहे. ही मंडली सर्वांच मनोरंजन करत असते. त्याच्यातील एकजूट पाहिल्यानंतर घरातील इतर सदस्यही त्यांना चिडवतात. मात्र आता या मंडलीतील सर्वात क्यूट स्पर्धक अब्दू घरातुन बाहेर गेला.

शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांची मैत्री तर सर्व प्रेक्षकांची आवडती जोडी होती. मात्र आता बिग बॉसच्या शो चा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. ज्यात अब्दु घरातून बाहेर जातांना दिसत आहे. त्याच्या जाण्याने घरातील सर्वच स्पर्धक दु:खी आहेत.

बिग बॉसशी संबधित काही इतर सोशल मिडिया हँडलवर अब्दू घरातुन बाहेर जाणार असल्याचं सांगितलं जात होत.

आता व्हायरल होत असलेल्या प्रोमोत बिग बॉस बोलताना दिसत आहेत की आतापर्यंत झालेल्या सिझनमध्ये असे पहिल्यांदाच झाले आहे. त्यानंतर अब्दु बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतो.

सर्व स्पर्धकांना आधी हे खोटं वाटतं मात्र नंतर अब्दु बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतो. तेव्हा सर्वच स्पर्धकांना धक्का बसला आहे. अब्दुच्या जाण्याची घोषणा ऐकू आल्यावर शिवला रडू कोसळतं. निमृतही रडायला लागते. तो गेल्यानंतर घरातले स्पर्धक त्याच्या बद्दल बोलतांना दिसता आणि साजिद खान आणि टीना दत्तादेखील रडतांना दिसतात.

हेही वाचा: पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

अब्दु जितका शिवच्या जवळ होता तितकाच तो एम सी स्टॅन आणि साजिदचा लाडका होता. त्यामुळे त्याच्या दोघेही खुप दु:खी आहेत.

बिग बॉसच्या घरात अब्दूची शिव ठाकरे, एमसी स्टॅन, निम्रत कौर आहलूवालिया,सुंबुल तौकीर यांच्यासोबत खूप चांगली मैत्री झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : युट्युबर ध्रुव राठी यांची सुटका

IND A vs AUS A: पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव, आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान! ऑस्ट्रेलिया अने जिंकली नाणेफेक; भारत अ प्रथम फलंदाजीला

Ratnagiri ST Bank: चार्जिंग स्टेशनचा महागडा निर्णय ?;नफ्यातील बँक पाडून एसटीवर भाड्याचा बोजा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT