Bigg Boss 16 esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: अंगुरी भाभी शिल्पाला साजिद खानचा लळा! 'त्याला एक तरी...'

टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असणारा शो म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. हा शो नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतो.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss 16: टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असणारा शो म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. हा शो नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतो. यावेळी या शोमधील स्पर्धक साजिद खान वादाच्या भोवऱ्यात आला आहे. त्याला त्या स्पर्धेमध्ये का घेतले असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. त्यावरुन वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी साजिद खानला सपोर्ट केला आहे तर काहींनी त्याच्यावर सडकून टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून साजिद खानवरुन वेगळाच वाद रंगलेला दिसतो आहे.

बिग बॉसच्या घरात साजिद तू काय करतो असं म्हणून नेटकऱ्यांनी साजिदला ट्रोल केले होते. देशातील प्रेक्षकांनी धारेवर धरले आहे. त्याच्यावर मी टू चे आरोप करण्यात आले होते. बॉलीवूडमधील बड्या सेलिब्रेटी अभिनेत्रींनी साजिदची पोलखोल केली होती. आता त्याला त्या शो मधून बाहेर काढण्यासाठी वेगळी मोहिम सोशल मीडियावर सुरु असल्याचे दिसून आले आहे. त्यावरुन त्याला ट्रोलही केले जात आहे. आतापर्यत साजिदला मंदाना करिमी, सोना मोहपात्रा यांनी चांगलेच झापले आहे. तर टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय मालिका असणाऱ्या अंगुरी भाभी फेम शिल्पानं त्याला सपोर्ट केलं आहे.

Bigg Boss 16 shilpa post

शिल्पानं साजिदसाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये ती लिहिते की, भूतकाळात त्यांच्याबाबत जे काही घडलं ते घडलं. त्यावरुन त्यांना सातत्यानं ट्रोल करणे चुकीचे आहे. आपण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलण्याची गरज आहे. काही लोकं अशी असतात की त्यांना त्यांच्या चुका कळल्यानंतर त्या बदलण्याचा प्रयत्न करतात. साजिद हा त्यापैकी एक आहे. त्यामुळे मी तर त्याला नेहमीच सपोर्ट करते. अशा शब्दांत अंगुरी भाभीनं साजिदप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Kolhapur-Sindhudurg Road : शिवडाव-सोनवडे घाटमार्गातील अंतिम अडसर दूर; केंद्रीय पर्यावरण समितीची मंजुरी, 13 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या कसा असणार नवा मार्ग

SCROLL FOR NEXT