BIGG BOSS Latest News BIGG BOSS Latest News
मनोरंजन

BIGG BOSS 16 : बिग बॉस एका सीझनसाठी किती घेतो फी? जाणून घ्या...

बिग बॉसच्या आवाजाची खूप क्रेझ आहे

सकाळ डिजिटल टीम

BIGG BOSS Latest News बिग बॉस १६ शनिवारपासून सुरू झाला आहे. सर्व १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे. यावेळी बिग बॉस १६ मध्ये असे काही स्पर्धक आहेत ज्यांचा अजिबात उल्लेख केला गेला नाही. त्यामुळे त्यांना शोमध्ये पाहणे मोठे आश्चर्य आहे. शो सुरू होण्यापूर्वी सलमान खानच्या (Salman Khan) फी बद्दल बरीच चर्चा झाली होती. परंतु, तुम्हाला माहीत आहे का बिग बॉसला (BIGG BOSS) आवाज कोण देतो आणि त्याला किती मानधन मिळते?

बिग बॉसची सुरुवात २००६ पासून झाली. तेव्हापासून लोकांमध्ये बिग बॉसच्या आवाजाची खूप क्रेझ आहे. बिग बॉसचे होस्ट बदलत राहिले. परंतु, बिग बॉसचा आवाज काही बदलला नाही. बिग बॉसला (BIGG BOSS) आवाज देणाऱ्या कलाकाराचे नाव आहे अतुल कपूर. अतुल कपूर हे प्रसिद्ध कलाकार आहे. अतुलला एका सीझनसाठी ५० लाख रुपये मिळतात.

प्रत्येक वेळी प्रमाणेच बिग बॉसच्या स्पर्धकांची खूप चर्चा झाली. अनेक सेलिब्रिटींची नावे चर्चेत होती. अशा परिस्थितीत काही नावे खरी ठरली तर काही पूर्णपणे चुकीची ठरली. मात्र, शोच्या पहिल्याच दिवशी सर्वांचे चेहरे समोर आले आहेत.

यावेळी बिग बॉस १६ मध्ये गोरी नागोरी, शिव ठाकरे, सौंदर्या शर्मा, शालीन भानोत, प्रियांका चहर चौधरी, सुंबुल तौकीर खान, अब्दू रोजिक, मन्या सिंह, एमसी स्टेन, गौतम सिंह विज, अर्चना गौतम, श्रीजीता डे, टीना दत्ता, निम्रत कौर अहलुवालिया, अंकित गुप्ता आणि साजिद खान दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT