Bigg Boss 16: Golden Boy Sunny nanasaheb waghchoure to enter as wild card contestant  Google
मनोरंजन

Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात गोल्डन बॉयची एन्ट्री, डोक्यापासून पायापर्यंत इतकं किलो सोनं घालतो अंगावर..

गोल्डन बॉय सनी नानासाहेब वाघचौरे बिग बॉस १६ मध्ये एन्ट्री करणार असल्यामुळे एम सी स्टॅनला सर्वाधिक धोका असू शकतो अशी चर्चा आहे.

प्रणाली मोरे

Bigg Boss 16: बिग बॉस १६ प्रेक्षकांसाठी फु्ल्ल ऑन एंटरटेन्मेंटचा डोस बनत चालला आहे. दिवसागणिक इथं नवा ड्राम पहायला मिळत आहे. बिग बॉसची ट्रॉफी पटकावण्यासाठी घरातील सदस्य नको नको ती शक्कल लढवताना दिसत आहेत. पण आता या दरम्यान आणखी एक मोठा धमाका बिग बॉसच्या घरात होणार आहे,ते एका वाइल्ड कार्ड एन्ट्रीच्या माध्यमातून. गोल्डन बॉय नावानं प्रसिद्ध असलेला सनी नानासाहेब वाघचौरे शो मध्ये एन्ट्री करणार आहे.(Bigg Boss 16: Golden Boy Sunny nanasaheb waghchoure to enter as wild card contestant)

सनी नानासाहेब वाघचौरे बिग बॉसमध्ये एन्ट्री करणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. गोल्डन बॉस बिग बॉसमध्ये येणार असल्याच्या बातमीनं टी.व्ही इंडस्ट्रीत मात्र खळबळ आहे. गोल्डन बॉयचे चाहते त्याला या शो मध्ये पाहण्यास उत्सुक झाले आहेत.

हेही वाचा: काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

गोल्डन बॉय नावानं प्रसिद्ध असलेला सनी नानासाहेब वाघचौरे सोशल मीडियावर भलताच प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 1.6M फॉलोअर्स आहेत. सनीला सोनं घालायला खूप आवडते. तो नेहमी अंगावर कितीतरी किलो सोनं घालून फिरत असतो. सनीच्या फोटोंमध्ये आपण पाहू शकता की त्याच्या गळ्यात कितीतरी किलोची भली मोठी जाडजूड चैन आहे. गोल्डन बॉयच्या हातात देखील सोन्याचे कडे दिसत आहेत. सनी अंगावर सोनं घातल्याशिवाय एकही फोटो क्लिक करत नाही.

बिग बॉसमध्ये सध्या असलेला एमसी स्टॅन देखील करोडोंचे दागिने घालण्यासाठी प्रसिद्ध आहे. बिग बॉसच्या घरात देखील तो आपले हे करोडोचे दागिने घालून मिरवताना दिसतो. अशामध्ये आता गोल्डन बॉयची घरामध्ये एन्ट्री होत असल्यामुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की आता बिग बॉसच्या घरात एम सी स्टॅन आणि गोल्डन बॉय यांच्यात त्यांच्या दागिन्यांमुळे जोरदार टक्कर पहायला मिळेल. कारण दोघेही त्यांच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

हाती आलेल्या वृत्तानुसार,एम सी स्टॅन आणि गोल्डन बॉय एकमेकांना आधीपासून ओळखतात. अशामध्ये दोघे जेव्हा बिग बॉसच्या घरात आमने-सामने येतील तेव्हा कदाचित मजेदार काहीतरी पहायला मिळेल अशी आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: पोलिसांचे कपडे घालायचा अन्...मुंबईत बनावट 'क्राइम ब्रांच ऑफिसर' पक्याला अटक, काय आहे प्रकरण?

Indian Martial Arts: पाच वर्षांच्या रिद्धीचा सिलंबममध्ये जागतिक विक्रम; दोन्ही हातांनी ११४ पेक्षा अधिक सलग रोटेशन पूर्ण

Pune News : पोटातून निघाला २८० ग्रॅमचा केसांचा 'पसरलेला गोळा'; पुण्यात 'रपुंझेल सिंड्रोम'वरील दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी

Barshi fraud:'बार्शीच्या शेतकऱ्याची सहा लाख रुपयांची फसवणूक'; ऊसतोडीसाठी मजूर पुरवणाचे आश्वासन, मुकादमाविरुद्ध गुन्हा दाखल

Sahyadri Adventure: नऊ वर्षांच्या मुलीने सर केला सह्याद्रीतील भैरवगड; रेवा रामदासीचे साहस

SCROLL FOR NEXT