Bigg Boss 16 News
Bigg Boss 16 News Bigg Boss 16 News
मनोरंजन

Bigg Boss 16 : घरात चालणार बिग बॉसची गुंडगिरी! एकापाठोपाठ नवीन नियम

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss 16 News सलमान खानने होस्ट केलेला रिॲलिटी टीव्ही शो बिग बॉस पूर्वीसारखा राहिलेला नाही. शोचा हा १६ वा सीझन आहे. यावेळी बिग बॉस स्वतः खेळणार असल्याचे प्रमोशनमध्ये सांगितले जात आहे. या एकाच वाक्याने स्पर्धकांपासून ते प्रेक्षकांच्या मनाला खिळवून ठेवले आहे. बिग बॉसच्या खेळात काय होणार आहे? हे सर्व स्पष्ट व्हायला थोडा वेळ लागेल. परंतु, सध्या एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे यावेळी बिग बॉसच्या घरात फक्त गुंडगिरी चालणार आहे.

गेल्या सीझनमध्ये अनेक स्पर्धक एकमेकांवर वर्चस्व गाजवत असल्याचे अनेकदा दिसून आले होते. खेळाडू मारामारी करायचे आणि खूप रडायचे. परंतु, बिग बॉस १६ च्या पहिल्या एपिसोडने या सीझनबद्दल बरेच काही स्पष्ट केले. बिग बॉसने निमृत कौरला फटकारले आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांना सांगितले की, कोणत्याही स्पर्धकाला तो आवडीच्या आधारे कधीही कॅप्टन बनवू शकतो.

अशा स्थितीत कॅप्टन्सी टास्कची काही विशेष भूमिका राहणार नाही, जी मागील हंगामात होती. बिग बॉस निमृत कौर अहलुवालियाला चेतावणी देताना दिसला. जर एखाद्या कर्णधाराने जबाबदारी पार पाडली नाही तर बिग बॉस त्याच्याकडून सर्व अधिकार काढून घेईल. म्हणजेच यावेळी बिग बॉस कोणालाही आपली मनमानी करू देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिग बॉस सीझन १६ च्या पहिल्याच एपिसोडमध्ये स्पर्धकांना आणखी एक धक्का बसला. बिग बॉसने खेळाडूंना सांगितले की, आता सकाळी वाजणारे गुड मॉर्निंग गाणे वाजणार नाही. त्या बदल्यात खेळाडूंना सकाळी बिग बॉसचे राष्ट्रगीत गावे लागेल. बिग बॉस एकापाठोपाठ एक नवीन नियम जाहीर करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पाऊसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT