Bigg Boss 16 MC Stan Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16 : 'माझे बुट 80 हजारांचे!' एमसी स्टॅननं बिग बॉसलाच सुनावलं, 'माझा खर्च सांगितला तर...'

बिग बॉस ऐन भरात आला असताना स्पर्धेत सहभागी स्पर्धकांची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. आता तर प्रसिद्ध रॅपर एम सी स्टॅन हा चर्चेत आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss 16 : बिग बॉस ऐन भरात आला असताना स्पर्धेत सहभागी स्पर्धकांची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. आता तर प्रसिद्ध रॅपर एम सी स्टॅन हा चर्चेत आला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. त्यानं चक्क बिग बॉसलाच आपण किती पैसे कमवतो आणि आपल्याला पैशांविषयी सांगितले आहे. एमसी स्टॅननं दिलेली प्रतिक्रिया व्हायरल झाली असून त्यावर नेटकऱ्यांनी देखील त्याची चांगलीच शाळा घेतली आहे.

येत्या रविवारी बिग बॉसचा अंतिम सोहळा पार पडणार असून आता सहभागी सगळ्याच स्पर्धकांनी आपली स्ट्रॅटर्जी ठरविण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर तर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. अनेकांनी त्यांना वाटणाऱ्या विजेत्यांची नावं देखील घोषित केली आहेत. यासगळ्यात एमसी स्टॅनचा तो व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

Also Read - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

देशातील सर्वाधिक लोकप्रिय रॅपर म्हणून एमसी स्टॅनच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. तो बिग बॉसमध्ये आल्यानंतर तो विजेता होईल असे भाकित अनेकांनी वर्तवले होते. याला दुसरे कारण म्हणजे त्याचा असणारा प्रचंड चाहतावर्ग. केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये एमसी स्टॅनचा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यानं अमाप संपत्ती कमावली आहे. त्या संपत्तीचा गर्व कधीकधी एमसी स्टॅनच्या बोलण्यातूनही दिसून येतो.

बिग बॉसमध्ये एमसी स्टॅनच्या चाहत्यांची भावना आहे की, तो विजेतेपद मिळवेल. प्रत्यक्षात चित्र काहीसे वेगळे आहे. एमसी स्टॅन हा अंतिम पाच स्पर्धकांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. आता तो यशस्वी होणार की नाही याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. एमसी स्टॅनचे व्यक्तिमत्व पाहून तो बिग बॉसमध्ये खळबळ उडवून देईल असे वाटले होते.

स्टॅनला त्यानंतर मंडलीची साथ मिळाली. म्हणून तो जास्तीत जास्त लोकप्रिय झाला आहे. मंडलीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यानं साजिद खान आणि शिव ठाकरेला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. पहिल्या दिवसापासून एमसी स्टॅन हा वैयक्तिक खेळताना दिसलेला नाही. त्यावरुनही त्याच्यावर टीका होताना दिसते आहे.

एमसी स्टॅननं अनेकदा शो मध्ये लोकप्रिय होण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले आहे. आता तर त्यानं आपल्याकडे किती संपत्ती आहे, पैसे आहेत याविषयी तो बोलताना दिसतो आहे. त्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी जोरदारपणे धारेवर धरले आहे. मी किती लोकप्रिय आहे हे त्यानं सांगितलं आहे. तो म्हणतो, बिग बॉसचा जेव्हा प्रीमिअर डे होता तेव्हा तो ८० हजारांची बुटस् परिधान करुन गेला होता. त्याची चर्चा होती.

बिग बॉसमध्ये तो आपल्या कोट्यवधी ज्वेलरीविषयी बोलताना दिसतो आहे. अतिशय गरीबीत दिवस व्यतीत केलेल्या एमसी स्टॅननं वयाच्या १२ व्या वर्षांपासून कव्वाली गायला सुरुवात केली. त्यानंतर तो २३ व्या वर्षी रॅपर झाला. आता तो लोकप्रिय गायक झाला आहे. त्याच्या नावाची देशभरात चर्चा आहे. बिग बॉसच्या घरात तो यशस्वी होणार की नाही याबद्दल त्याच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT