Bigg Boss 16 Tina Datta Shalin Bhanot Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: 'नुसतं नाटक..' सदस्य आता शालिन अन् टिनावर भडकलेच नाही तर केलं...

Vaishali Patil

बिग बॉस 16 मध्ये सध्या खूप गोंधळ सुरू आहे. सलमान खानने शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्यावर ताशेरे ओढले असतानाच कुटुंबातील सदस्यही या दोघांवर भडकले आहेत.

आता बिग बॉसचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये घरातील सदस्य पुन्हा एकदा शालीन आणि टीनावर हल्ला करत आहेत.

या प्रोमो व्हिडिओमध्ये, बिग बॉस घरातील सदस्यांना एक टास्क देतात आणि म्हणतात, "आज मला हे जाणून घ्यायचं आहे की इतक्या आठवड्यांनंतरही घरात असं कोण आहे, कोणाची प्रतिमा अजूनही अस्पष्ट आहे." यावर अर्चनापासून अब्दूपर्यंत सगळेच शालीन आणि टीनाचं नावे घेतात.

बिग बॉस 16 च्या या व्हिडिओमध्ये अर्चना गौतम म्हणते की मला शालीन आणि टीनाला यासाठी बोलवायचं आहे. कारण मला त्यांची प्रतिमा अजुनही अस्पष्ट वाटत आहे.

एवढेच नाही तर अर्चना असेही म्हणते की, "शालीनला या शोमधून काय हवे आहे, हे मला समजत नाही. जर शालीन आणि टीना प्रेमात आहेत, तर स्पष्ट म्हणा नाहितर आम्ही फक्त टाईमपास करत आहोत, आम्हाला फक्त शोमध्ये टॉप 3 मध्ये यायचे आहे." (Bigg Boss 16 New Promo Video)

त्याच वेळी, अब्दू शालीन भानोतचे नाव घेतो आणि म्हणतो की तो फक्त 24 तास ओव्हर अॅक्टिंग करतो.

सुंबुल तौकीर खानही शालीन भानोतवर भडकते. पण आश्चर्य म्हणजे या टास्कमध्ये टीना दत्ता देखील शालिनाचं नाव घेते.

व्हिडिओमध्ये टीना दत्ता म्हणते की, "शालीन नेहमी मी-मी करत राहतो. मी तुझ्यासाठी हे केले, तुझ्यासाठी ते केले. आता काही कारणास्तव मी त्याला 'शा' म्हणणे बंद केले आहे." बिग बॉस 16 च्या या प्रोमो व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT