Bigg Boss 16  esakal
मनोरंजन

Bigg Boss 16 : 'प्रियंकाच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी! जिंकली की काय?'

बिग बॉसच्या यंदाच्या पर्वामध्ये ज्या स्पर्धकानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे त्या प्रियंका चौधरीच्या नावाची मोठी चर्चा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss 16 Priyanka Choudhary grand finale winning troffi : बिग बॉसच्या यंदाच्या पर्वामध्ये ज्या स्पर्धकानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे त्या प्रियंका चौधरीच्या नावाची मोठी चर्चा आहे. परवा या शोचा फिनाले पार पडणार आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदापर चर्चा असल्याचे दिसून आले आहे. आता तर प्रियंकाचा बिग बॉसची ट्रॉफी घेतल्याचा फोटो व्हायरल झाला असून त्याला लाखो चाहत्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.

बिग बॉसचा होस्ट सलमान खानकडून देखील प्रियंकाला खूप ओरडा खावा लागला आहे. मात्र प्रियंकानं मोठ्या संयमानं स्वताला साऱ्या गोंधळापासून वाचवलं आहे. त्यामुळे तिनं रागाच्या भरात कोणतीही टोकाची प्रतिक्रिया दिलेली नाही. याचा परिणाम असा की, तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. सोशल मीडियावर तर अनेकांनी प्रियंकाला संभाव्य विजेता म्हणून घोषित केले आहे.

Also Read - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यावर्षीच्या सीझनमध्ये सर्वाधिक प्रभावशाली आणि प्रबळ दावेदार म्हणून प्रियंकाकडे पाहिले जात आहे. प्रियंकाची स्पर्धा शालिन, शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि अर्चना गौतम यांच्याशी असल्याचे दिसून आले आहे. टॉप फाईव्हमध्ये तर गेली आहे. मात्र त्यातून ती विजेता होणार असल्याची चर्चा सर्वाधिक व्हायरल होत आहे. फिनाले पूर्वीच प्रियंकाचा एक फोटो व्हायरल होतो आहे त्यामध्ये तिनं हातात बिग बॉसची ट्रॉफी घेतली आहे. त्यावर तिला वेगवेगळ्या प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत.

पूर्ण सीझनमध्ये प्रियंकानं आपल्या प्रभावी खेळानं प्रेक्षकांना आणि चाहत्यांना जिंकून घेतलं आहे. त्यांनी तिच्या आतापर्यतच्या परफॉर्मन्सवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे प्रियंकाच्या लाखो चाहत्यांना ती विजयी होईल अशी खात्री आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका, आता एसटीचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले संकेत...

Kolhapur Ministers Convoy Stopped : कोल्हापुरातील मंत्र्यांचे दिशादर्शक पाऊल; मुश्रीफ, आबिटकर, क्षीरसागरांनी वाहनांचा ताफा नाकारला, आमदार, खासदार बंद करणार का?

Chhatrapati Sambhaji Maharaj Procession : छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणूकीला पोलिसांनी परवानगी नाकारली, शिव-शंभू समर्थक आक्रमक, गारगोटीत तणाव

मोठी बातमी! मॉर्टगेज लोनसाठी शेतकऱ्यांना बॅंकांचे दरवाजे बंद; थकबाकी वाढल्याने बॅंकांनी आखडला हात; केवळ पीक कर्जवाटपालाच प्राधान्य, वाचा...

Panchang 15 May 2026 : आजचे पंचांग! शनि जयंती, अमावस्या आणि शुभ मुहूर्त; जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण राशीभविष्य

SCROLL FOR NEXT