Bigg Boss 16 Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: 'तूझ्यासोबत नाही बोलायचं', शिवचं निमृतसोबत खटकलं...

'बिग बॉस 16'मध्ये शिव ठाकरे आणि निमृत कौर अहलुवालिया यांच्यातील मतभेद आता भांडणात रुपांतरित झाले आहे.

Vaishali Patil

' बिग बॉस 16' मध्ये आज एलिमिनेशन होणार आहे. या आठवड्यात टीना दत्ता, शालीन भानोत, सौंदर्या शर्मा आणि सुंबुल तौकीर खान नामांकित आहेत. मात्र या सगळयात शिव आणि निमृतचं जोरदार भांडण झालं आहे.

शोमध्ये निमृत आणि शिव यांची खूप घट्ट मैत्री आहे. त्याच्यात कधीच वाद झालेला दिसला नाही. नेहमीच दोघांनी सहमतीने निर्णय घेतले. शिव आणि निमृतची मैत्री कालांतराने घट्ट होत गेली. मात्र जेव्हा निमृतच्या वडिलांनी तिला आणि शिवला वेगळं खेळण्याचा सल्ला दिला तेव्हा या मैत्रीत तडा गेला.

दरम्यान बिग बॉसच्या निर्मात्यांनी एक प्रोमो जारी केला आहे, ज्यामध्ये  बिग बॉस घरातील सदस्यांना नामांकित सदस्यांपैकी एकाचं नाव देण्यास सांगतात .

प्रियंका चहर चौधरी, शिव आणि इतरांनी सौंदर्याचे नाव एलिमिनेशनसाठी घेतले. पण अर्चना म्हणते की सौंदर्या शर्मा सर्व कामे चांगल्या प्रकारे करते आणि प्रत्येक गोष्टीत भाग घेते आणि ती शालीनचं नावं सांगते. पण या सगळ्या चर्चेत निम्रित कौर अहलुवालियाला वाटतं की शिव असभ्य वागतोय. ती शिवला यावरुनच प्रश्न करते आणि त्यांच्यात भांडण होतं.

निमृत शिवला म्हणते, 'तू इतका हायपर का होतोय? मी इथं भांडण करायला आलेली नाही. यावर शिव म्हणतो की तो तिच्याशी बोलत नाही मग ती मध्येच का बोलत आहे. शिव म्हणतो, ' इथे खेळ खेळायला आली आहेस इथं? की भांडण करायला?

यांनतर दोघांमध्ये वाद होतो आणि यावर शिवने आपला संयम तुटतो आणि तो त्याच्य जॅकेट फेकतो आणि म्हणातो, 'मी काहीही बोललो तरी प्रॉब्लम.' आता शिव आणि निमृतची मैत्री टिकते की फिनालेसोबतच ती तुटते हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarique Rahman : तारिक रहमान - डार्क प्रिन्स, भ्रष्टाचाराचे आरोप, तुरुंगवास, मृत्यूदंडाची शिक्षा, लंडनला पलायन अन् आता बांगलादेशचे संभाव्य पंतप्रधान!

T20 World Cup : यूएईचा थरारक विजय अन् अफगाणिस्तानचे स्पर्धेतील पॅकअप जवळपास निश्चित! ड गटात मोठी उलथापालथ

Nagpur crime : नागपूरचं समाजस्वास्थ बिघडलं; गुन्हेगारीत प्रचंड वाढ; ४३ टक्क्यांनी वाढल्या खूनाच्या घटना

Latest Marathi News Live Update : पुण्यात तीन हजार वाहनचालकांचे परवाने रद्द

Mumbai Goa: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गाचे चार पदरी काम कधी पूर्ण होणार? नवीन तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT