bigg boss 17 ankita lokhande on disha salian Sushant singh rajput connection Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: "ती सुशांतची मॅनेजर नव्हे तर..." बिग बॉसच्या घरात दिशा सालियनबद्दल अंकिताचा मोठा खुलासा! चर्चांना उधाण

अंकिता पुन्हा सुशांत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियानबद्दल बिग बॉसच्या घरात बोलली आहे.

Vaishali Patil

Ankita Lokhande:  मनोरंजन जगतातील सर्वात वादग्रस्त शो म्हणजे 'बिग बॉस 17'. आता बिग बॉसच्या 17 वा सिझन फायनलकडे वळत आहेत. त्यामुळे जसजसा फिनाले जवळ येत आहे, तसतशी प्रेक्षकांची उत्सुकता आणि घरात वेगवेगळे ट्विस्ट होत आहेत.

घरातील चर्चेत असलेली स्पर्धक अंकिता लोखंडे पुन्हा एकदा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलली आहे. ज्यामुळे आता नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे. यापुर्वी देखील अंकिता बिग बॉसच्या घरात सुशांतबद्दल बोलली आहे. यामुळे तिला अनेकदा ट्रोलही करण्यात आलं आहे. तरी देखील आता पुन्हा अंकिता सुशांत आणि त्यांची मॅनेजर दिशा सालियानबद्दल बोलली आहे.

ओराने अंकिताला विचारले होते की, ती सोशल मीडियावर लोकांना ब्लॉक करते का? ओराच्या प्रश्नाचे उत्तर देत अंकिताने सांगितले की, 'हो, मी अनेकांना ब्लॉक करते. यापुर्वीही केले ब्लॉक आहे. तर मुनव्वरने सांगितले की तो, "ब्लॉक नाही तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो."

यानंतर अंकिताने सांगितले की, 'पण मी त्यावेळी अनेकांना ब्लॉक केलं होतं. कारण ते इतकं वाईट बोलत होते की त्यामुळे मी त्यांना सहन करु शकत नव्हते.'

यानंतर जेव्हा मुनव्वरने तिला विचारले की, "सुशांतच्या मॅनेजरचा मृत्यू, त्याच्या मृत्यू आधी झाला की त्याच्या मृत्यूनंतर?"

यावर अंकिताने खुलासा केला की, 'ती सुशांतची मॅनेजर नव्हती. तिने एकदा त्याला 5-6 दिवसांसाठी मॅनेज केलं होतं. पण ती त्याची मॅनेजर नव्हती.'

आता सध्या सोशल मिडियावर अंकिताने केलेल्या वक्तव्यांची चर्चा होत आहे.

यंदाचा विकेंड का वार खुपच गाजला. कारण यावेळी घरात एक दोन नव्हे तर तीन स्पर्धकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या वीकेंड का वार मध्ये रिंकू धवन आणि नील भट्ट शोमधून बाहेर पडले. त्यानंतर अनुराग डोवालला देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तर आता पुन्हा घरात राडा सुरु झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT