Bigg Boss 17: Ankita Lokhande reveals why she did not attend ex-boyfriend Sushant Singh Rajput’s funeral Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: 'मी त्याच्या अंत्यसंस्काराला नाही गेले कारण..', सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबद्दल अंकिताचा पुन्हा नवीन खुलासा

अंकिताने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण काढली आहे.

Vaishali Patil

'बिग बॉस 17' गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील अनेक स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे अंकिता लोखंडे. अंकिताने पहिल्या दिवसापासून गेम खेळायला सुरुवात केली आणि ती प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. मात्र या शोमध्ये अंकिताने खुप खुलासे केले आहे. त्यातच आता पुन्हा अंकिताने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण काढली आहे.

नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अंकिता मुनव्वर फारुकीसोबत सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलताना दिसली. ती मुनव्वरला तिच्या तुटलेल्या हृदयाबद्दल सांगत असते. यावर मुनव्वर एक कविता ऐकवतो आणि मग अंकिता त्याला म्हणते की 'म्हणू नकोस, हे सगळं खूप जिव्हारी लागत , पण तू जे काही बोललास ते मला आवडलं.' यानंतर अंकिता सुशांतच्या 'धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मधील 'कौन तुझे' हे गाणे गाऊ लागते.

सुशांतची आठवण काढताना अंकिता सांगते की तो खूप चांगला माणूस होता. जेव्हा मी असं म्हणते की 'होता' त्यावेळी खुप वेगळं वाटतं. सुशांत विकीचाही मित्र होता, पण तो आता या जगात नाही, ही भावना खूप वाईट आहे.

'मला याबाबत आत्ताच काही बोलायचे नाही, पण असे नाही की मला तुला काही सांगायचं नाही आहे. यावेळी अंकिताने खुलासा केला की ती सुशांतच्या अंत्यसंस्कारात ती सहभागी होऊ शकली नाही कारण ही बातमी तिच्यासाठी धक्कादायक होती.

पुढे अंकिता म्हणाली, 'मी त्यांच्या अंत्यसंस्कारालाही गेले नव्हते. मी जाऊ शकली नाही, मला वाटलं की मी हे सर्व पाहण्याची ताकद माझ्यात नाही. विकी म्हणाला की तू जाऊन ये. मी नाही म्हणाले. मी कसे पाहू शकली असते? असा अनुभव माझ्या आयुष्यात कधीच आला नव्हता. मी माझ्या वडीलांचे जाणे हे पहिल्यांदा असे पाहिले. एखाद्याला गमावणं काय असतं हे मी पहिल्यांदा शिकले. सध्या अंकिता लोखंडे तिच्या पतीसोबत बिग बॉसमध्ये गेम खेळताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT