Bigg Boss 17 Ankita Lokhande Share Sushat Singh Rajput Memories esakal
मनोरंजन

Bigg Boss 17 : सुशांतची आठवण येताच अंकिताच्या डोळ्यात पाणी, 'त्यानं नेहमीच....'! काय म्हणाली ती?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं चर्चेला उधाण आले आहे.

युगंधर ताजणे

Bigg Boss 17 Ankita Lokhande Share Sushat Singh Rajput Memories : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्घ रियॅलिटी शो बिग बॉसच्या १७ व्या सीझनच्या वेगवेगळ्या घडामोडी आता समोर येऊ लागल्या आहेत. यंदाचा सीझनही हटके आणि चर्चेतला ठरत आहे. सध्या बिग बॉसच्या लेटेस्ट प्रोमोची जोरदार चर्चा आहे. त्यात अंकिता सुशांतच्या आठवणीत भावूक झाल्याचे दिसून आले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं चर्चेला उधाण आले आहे. बिग बॉसच्या गार्डन एरियामध्ये अंकितानं अभिनेता अभिषेक कुमार सोबत सुशांत सिंग राजपूतच्या प्रवासाविषयी आठवणी शेयर केल्या आहेत. तिनं सुशांतचा बॉलीवूडमधील संघर्ष फारच मोठा होता. त्याविषयी अनेकांना माहिती नाही. असे अंकितांनं त्याला सांगितले. Bigg Boss 17 Ankita Lokhande Share Sushat Singh Rajput Memories

सध्याच्या घडीला बिग बॉस १७ मधील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी म्हणून अंकिताचे नाव घ्यावे लागेल. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावरही तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अंकितासाठी बिग बॉस पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्याही मोठी आहे. यापूर्वी देखील अंकितानं वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेयर करत तिचा फॅनबेस वाढवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.

यावेळी तिनं तिचा मित्र सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्या आठवणींना उजाळा देताना तिला रडू आले आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तिनं अभिनेता अभिषेक कुमारला सुशांत सिंग काय होता, त्याचा संघर्ष किती मोठा होता याविषयी सांगितले आहे. ती म्हणते सुशांतनं यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.

केवळ अभिषेकच नाही तर मुनव्वर फारुखी सोबत देखील ती नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या गप्पागोष्टी करताना दिसते. अंकिता म्हणाली की, सुशांत हा नेहमीच प्रभावी राहिला. त्याचा संघर्ष मोठा आहे. त्याला त्याच्या अविरत कष्टानं खूप लोकप्रिय केलं. त्याच्या संघर्षाची तीव्रता खूपच मोठी होती. हे सांगताना अंकिताला रडू आल्याचे यावेळी दिसून आले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांनी अंकिताला दिलेल्या प्रतिक्रियाही चर्चेत आहे. ही चर्चा ऐकल्यानंतर अभिषेक तिला म्हणतो की, यापुढे मी तुझ्यासमोर सुशांत सिंगचा कधीही विषय काढणार नाही. त्यावर अंकिता म्हणते, मला या विषयावर बोलण्यास नेहमीच आवडते. तो माझ्या अभिमानाचा भाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif on Sunetra Pawar : सुनेत्रा पवार-प्रशांत किशोर भेटीवर हसन मुश्रीफांचं सूचक मौन; "मुंबईत काय घडलं माहिती नाही"

Bhira Hydroelectric Project : मुंबईच्या पाणीप्रश्नावर मोठा तोडगा! कोयना नव्हे, आता 'मुळशी'तून पश्चिमेकडे पाणी वळवण्याची मागणी; भिरा प्रकल्पातील 300 मेगावॉटमुळे होणार फायदा?

Gold Rate Today: बापरे! सोनं 84,000 हजारांनी महागलं; 4 दिवसांत मोठी वाढ; आता किती रुपयांना मिळतंय?

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर हसन मुश्रीफ काय म्हणाले

Katraj Dairy Milk Price: कात्रज डेअरीच्या दूध दरात वाढ; दुग्धजन्य पदार्थही महागणार... किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT