ankita lokhande emotional in the memory of sushant singh rajput at bigg boss 17 house  SAKAL
मनोरंजन

Bigg Boss 17: " ब्रेकअपनंतर एका रात्रीत माझं आयुष्य..", बिग बॉसच्या घरात अंकिताने सुशांतसोबतच्या नात्याचा केला खुलासा

अंकिता लोखंडे 'बिग बॉस 17' मध्ये पती विकी जैनसोबत दिसत आहे. अंकिताने सुशांत सिंग राजपूतची आठवण काढली आहे.

Vaishali Patil

Ankita Lokhande on Sushant Singh Rajput: सध्या लोकप्रिय टीव्ही शो 'बिग बॉस 17' खुपच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून घरात खुपच ड्रामा सुरु आहे.

एकीकडे इशा आणि तिचा प्रियकर समर्थ आणि अभिषेक यांच्यातील राडा तर दुसरीकडे अंकिता आणि तिचा पती विकी जैन यांच्यातील वाद यामुळे घरात एक वेगळच वातावरण तयार झालं आहे. 'बिग बॉस 17' च्या घरात पहिल्या दिवसापासून अंकिता लोखंडे आणि विकी जैन चर्चेत आहे.

दरम्यान, आता अंकिता लोखंडे बिग बॉसच्या शोमध्ये तिचा माजी प्रियकर आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण काढताना दिसत आहे.

सुशांत सिंग राजपूतसोबतच्या ब्रेकअपबद्दल अंकिता मुनव्वर फारुकीसोबत बोलत होती. गार्ड परिसरात फिरताना ते बोलत होते. यावेळी अंकिता तिच्या आणि सुशांतच्या ब्रेकअपबद्दल बोलली.

यावेळी अंकिताने सांगितले की, सुशांतपासून वेगळे झाल्यानंतर ती पूर्णपणे तुटली होती. एका रात्रीत तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. कोणतेही कारण नसताना दोघांचे ब्रेकअप झाले.

अंकिता म्हणताना दिसली - " सुशांतचं जाणं ही खुप वेगळी गोष्ट होती, मी खूप तुटले होती, माझे आई-वडील खूप तुटले होते. एका रात्रीत माझ्या आयुष्यात सर्व काही बदललं."

सुशांतच्या निधनानंतर लोकांनी तिला खूप ट्रोल केलं गेलं. सुशांतच्या आयुष्यात जर अंकिता असती तर त्याने कदाचित आत्महत्या केली नसती असं लोकांना वाटत होत. मात्र जेव्हा दोघांचे नाते तुटलं तेव्हा ती लोकं कुठे होती. असा प्रश्न अंकिताने विचारला.

पुढे अंकिता म्हणाली की, 'जेव्हा आमचे ब्रेकअप झाले होते तेव्हा लोकं का म्हटली नाहीत की तू अंकितासोबत रहा. मला वाटत होते की त्याने मला त्या गोष्टींबद्दल सांगितलं असतं तर मी स्वतःला साभाळलं असतं. पण अचानक मी खूप बिथरले. पण त्यावेळेस तो प्रसिद्धीच्या झोतात होता त्यावेळी त्याची कान भरणारी लोकही होती. तो निर्णय त्याचा होता मी त्याला कोणत्याच गोष्टीसाठी रोखलं नाही.'

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी अंकिताची बाजू घेत आहे तर काही तिला ट्रोल करत आहेत.

अंकिता आणि सुशांत पवित्र रिश्ता या मालिकेत एकत्र दिसले होते. ते दोघेही जवळपास 7 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2016 मध्ये त्याचे ब्रेकअप झाले. आता अंकिताने विक्की जैनसोबत लग्न केले आहेत. हे दोघेही बिग बॉसच्या घरात एकत्र गेम खेळत आहे. मात्र त्यांच्यात खुप मतभेद होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT