Bigg Boss 17 K- Pop star Aoora gets eliminated from the show grand finale date finalists  
मनोरंजन

Bigg Boss 17: अभिषेक आला पण 'हा' स्पर्धक गेला! बिग बॉस 17 चा फिनाले कधी होणार?

28 जानेवारी 2024 रोजी बिग बॉसचा फिनाले होणार आहे. सलमान खानने याबद्दल माहिती दिली.

Vaishali Patil

Bigg Boss 17: वादग्रस्त टीव्ही शो 'बिग बॉस 17' प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये रोज नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता हा शो शेवटच्या टप्प्यात पोहोचणार आहे. ज्यासाठी चाहत्यांपासून ते स्पर्धकांपर्यंत सर्वांनाच खूप उत्सुकता आहे. तर आता घरात बरेच वाद विवाद झाल्यानंतर बिग बॉसने सर्वांना आणखी एक धक्का दिला आहे.

एकीकडे बिग बॉसच्या घरात कधीन न घडलेली घटना झाली. घरात हाणामारी करुनही अभिषेक पुन्हा घरात परतला. तर आता वीकेंड का वार मध्ये एका स्पर्धकाचा प्रवास संपला आहे. तो स्पर्धक म्हणजे के पॉप स्टार ओरा आहे.

ओराने दोन आठवड्यांपूर्वी बिग बॉस 17 मध्ये वाइल्डकार्ड म्हणून प्रवेश केला होता, काही वेळातच त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ओराने घरातून बाहेर जाताना स्पर्धकांना मिठी मारली.

ही संधी दिल्याबद्दल त्याने सलमान खानचे आभार मानले. ओराचे घरातील लोकांसोबत चांगले संबंध होते. के-पॉप गायक ओराच्या केसांचीही बिग बॉसमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. तो प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्या केसांचा रंग बदलत होता.

28 जानेवारी 2024 रोजी बिग बॉसचा फिनाले होणार आहे. सलमान खानने याबद्दल माहिती दिली. कलर्सवर रविवारी रात्री 9 वाजता बिग बॉसचा फिनाले प्रेक्षकांना दिसणार आहे. Jio सिनेमावर हा शो दिसणार आहे.

आता ओरानंतर ईशा मालवीय, अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे, विकी जैन, आयशा खान, अरुण महाशेट्टी, समर्थ जुरेल, मन्नारा चोप्रा आणि मुनावर फारुकी हे स्पर्धक घरात आहेत. त्यामध्ये आता घरातील कोणते स्पर्धक टॉप 5 मध्ये जाणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT