Bigg Boss 17: Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: 'माझा पाच वर्षाचा मुलगा.." मुनव्वरचं इमोशनल बोलणं ऐकून निलही गहिवरला! व्हिडिओ व्हायरल

नाव्वर आपल्या लाडक्या लेकाच्या आठवणीत खुपच भावूक झाला.

Vaishali Patil

Munawar Faruqui Got Emotional In Bigg Boss 17: बिग बॉसचा सिझन 17 सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये स्पर्धकांनी आता त्याचे खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे घरात रोजच भांडण होत आहे तर दुसरीकडे काही स्पर्धकांमध्ये घट्ट मैत्री झाल्याचं दिसत आहे.

या शो दरम्यान स्पर्धक आक्रमकही होतात तर काही भावूकही होतात. त्याच्या आयुष्यातील भावनिक किस्से ते स्पर्धकांना सांगतात. हे किस्से ऐकल्यानंतर स्पर्धकांसह चाहतेही भावूक होत असतात.

असाच एक स्पर्धक आज खुपच भावनिक झालेला दिसला. तो स्पर्धक होता घरातील सर्वात मजबूत आणि हूशार स्पर्धक मुनव्वर फारुकी. मुनव्वर आपल्या लाडक्या लेकाच्या आठवणीत खुपच भावूक झाला. इतकच नाही तर नीलला त्याच्याबाबत सांगताना तो ढसाढसा रडू लागला.

यावेळी नीलसोबत बोलताना मुनाव्वर म्हणतो का, 'मला 5 वर्षांचा मुलगा आहे. तो माझ्यापासून वेगळा राहत होता पण तो 6 महिन्यांपूर्वीच माझ्याकडे आला आहे आणि आता माझ्यासोबत आहे. मला माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टीची उणीव भासत होती हे तो माझ्याकडे आल्यानंतर मला कळाले. 3-4 महिन्यांतच मी त्याच्याशी खूप कनेक्ट झालो आहे. आता मला फक्त त्याचाच विचार येतो. मी त्याला खुपच मिस करतोय. दिवसभर त्याचाच विचार करतो.'

हे सगळं सांगताना मुनव्वर खुपच भावूक होते तर यावेळी नील आणि अभिषेक मुनव्वरला साथ देतात आणि त्याची काळजी घेतात. तर मुनव्वरची अशी अवस्था पाहून त्याचे चाहते दु:खी झाले आहेत.

लॉकअप शो दरम्यान मुनव्वरने सांगितले की त्याचे लग्न झालेले आहे. त्याने हे लग्न सगळ्यांपासून लपवून ठेवले. तो खुप लहान असताना त्याचे लग्न झाले होते आणि त्याला एक मुलगा आहे. आता तो आणि त्यांची पत्नी वेगळे झाले असून हे प्रकरण न्यायालयात सुरु आहे.

एक लोकप्रिय स्टँड अप कॉमेडियन मुनाव्वर फारुकी याने बिग बॉसमध्ये येण्यापुर्वी कंगना राणौतचा शो लॉकअप सीझन 1 जिंकला होता. मुनव्वर चे व्यक्तिमत्व हे खुपच वादग्रस्त राहिले आहे. तो तुरुंगात जाण्यापासून त्याच्या लग्नापर्यंत आणि मुलांपर्यंत सगळ्या गोष्टीमुळे तो लाइमलाईटमध्ये आला आणि वादातही अडकला आहे. आता तो बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT