Bigg Boss 17 Elimination:  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17 Elimination: पहिल्या आठवड्यातच कोणाचा पत्ता होणार कट? या स्पर्धकांचे झाले नॉमिनेशन

Bigg Boss 17 Elimination: बिग बॉस 17 च्या घरातून बाहेर काढण्यासाठी तीन स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आले आहे.

Vaishali Patil

Bigg Boss 17 Elimination: बिग बॉस सीझन 17 ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. 17 स्पर्धकांसह सुरु झालेल्या या गेममध्ये आता प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धक घराबाहेर जाईल आणि शेवटच्या दिवशी या सीझनचा विजेता कोण असेल याचा खुलासा होईल.

यावेळी बिग बॉसच्या घरात वेगळच वातावरण पहायला मिळत आहे कारण घरात मनोरंजन, पत्रकारिता, व्यवसाय आणि सोशल मीडियातील सेलिब्रिटी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा सहभाग आहे.

बिग बॉस सुरू होऊन तीन दिवस झाले असून घरात पहिली नॉमिनेशन प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. पहिल्या आठवड्यात घरातील तीन स्पर्धक एलिमिनेट झाले आहेत.

सर्व स्पर्धकांनी मिळून तीन स्पर्धकांना बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी निर्मात्यांनी शेयर केलेल्या प्रोमोत प्रियांका चोप्राची बहीण मन्नारा चोप्राचे नाव समोर आले होते आता त्यात आणखी दोन स्पर्धकांची नावं समोर आली आहे.

तर पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस 17' च्या घरात मन्नारा चोप्रा, नवीद सोले आणि अभिषेक कुमार यांना घरातून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. अभिषेक कुमार हा घरातील खुपच हुशार स्पर्धक असल्याचं दिसलं आहे.

मात्र त्याचे नॉमिनेशन झाल्यानंतर त्याचे चाहते काहीसे निराश झाले आहे. तर आपल्या नावाचा उल्लेख आल्यानंतर मन्नाराही भावूक झाली होती.

आता शोच्या पहिल्या 'वीकेंड का वार'मध्ये बिग बॉस कोणाला घरातून बाहेर करतो आणि कुणाला पुन्हा संधी मिळते हे लवकरच कळेल.

आपण 'बिग बॉस 17' च्या स्पर्धकांमध्ये अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि नवीन सोले यांच्याशिवाय मुन्नवर फारुकी, अंकिता लोखंडे, विकी जैन, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, ईशा मालवीय, सना रईस खान, सोनिया बन्सल, अनुराग डोवाल, जिग्ना व्होरा, फिरोजा खान, सनी आर्या, रिंकी धवन आणि अरुण श्रीकांत मशेट्टी यांसारख्या टीव्ही स्टार्सचा समावेश आहे. आता कोणता स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करतो हे पहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं आंदोलन सुरु; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT