Bigg Boss 17 Orhan Awatramani Aka Orry Is Out Of Salman Khan’s Show Find Out Why  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: एका दिवसातच ओरीने गाशा गुंडाळला! बिग बॉसच्या घरातून पडला बाहेर

Vaishali Patil

Orry in 'Bigg Boss 17': 'बिग बॉस 17' सध्या खुप चर्चेत आला आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील विकेंड का वार हा खुपच वेगळा होता. जिथे सलमानने खानझादी आणि मन्नारा चोप्रा यांना फटकारले तर दुसरीकडे अंकिता आणि विकीच्या आईने दोघांना समजावले.

मात्र नेटकऱ्यांना विकीच्या आईचे बोलणे खटकले. तर या विकेंड का वारमध्ये घरात सोशल मिडियावरील नेहमी चर्चेत राहणाऱ्या ओरीने एंट्री केली.

ओरीने यावेळी घरात खुपच धमाल मस्ती केली. त्याचबरोबर त्याच्या आयुष्याबद्दल शॉकिंग खुलासेही केले आहेत.

ओरी म्हणजेच ओरहान अवत्रामणी याने शनिवार वार या शोमध्ये प्रवेश केला. घरात प्रवेश करताच ओरीने सर्वांना आपल्या तालावर नाचवले.

मात्र सर्वाना वाटत होतं की तो या घरात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणुन आला आहे मात्र तसं झालं नाही. तो 'बिग बॉस 17' मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणुन नाही तर खास पाहुणा म्हणून आला होता. ओरी रविवारी शोमधून बाहेर गेला. ओरीनं एका दिवसात बिग बॉसच्या घरातून काढता पाय घेतला.

यावेळी बिग बॉसच्या घरात जस्ट चिल विथ सोहेल आणि अरबाज सेशन झालं. ज्यामध्ये अरबाज खान आणि सोहेल खानने पुन्हा कुटुंबातील सदस्यांचे मनोरंजन केले मात्र शेवटी त्यांनी बाहेर जाताना ओरीलाही त्यांच्यासोबत नेले. त्यांनी घरातील सर्व सदस्यांना सांगितले की ओरी फक्त एका दिवसासाठी शोमध्ये सहभागी झाला होता.

​​

ओरी फक्त एक दिवस घरात राहिला मात्र त्याने सर्वांचे भरभरुन मनोरंजन केले. ओरीने घरात पार्टीचे आयोजनही केले होते.

ऑरी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याच्या चर्चा शनिवारीच सुरु झाल्या होत्या. कारण शनिवारी रात्री तो 'द आर्चीज'च्या कार्यक्रमात स्पॉट झाला होता. त्याचे बरेच व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. ज्यामुळे नेटकऱ्यांनी तो घरातून बाहेर पडल्याचे बोलले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT