Bigg Boss 17 Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: बिग बॉस सुरू आहे की लस्ट स्टोरीज? ईशा अन् समर्थ पुन्हा कॅमेऱ्यासमोर झाले इंटिमेट!

Vaishali Patil

Isha Malviya-Samarth Jurel Viral Video:  टिव्ही विश्वातील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' सध्या खुपच चर्चेत आहे. आता हा शो सुरु होऊन एक महिना झाला आहे.

या एका महिन्यातच प्रेक्षकांनी घरात अनेक वाद विवाद आणि मैत्रींची नातीही पाहिली. तर दुसरीकडे प्रेमाचा त्रिकोणही प्रेक्षकांना पहायला मिळाला.

काही दिवसांपुर्वी घरात प्रेक्षकांना इशा मालविय आणि अभिषेक कुमार यांची लव्ह स्टोरी पहायला मिळत होती त्यातच इशाचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेलने घरात एंट्री केली. समर्थने घरातील वातावरण दुषित केल्याचा आरोप प्रेक्षक त्याच्यावर करत आहेत.

काही दिवसांपुर्वी या लव्ह बर्ड्सचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. ज्यात ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल एकमेकांशी जवळीक साधताना दिसले होते. या व्हिडिओनंतर दोघांनाही सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले होते.

इतकच नाही तर ईशाच्या कुटुंबीयांनीही तिच्यावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर देखील ईशा आणि समर्थ यांनी पुन्हा तशीच काहीशी कृती केली आहे ज्यामुळे त्यावर टीका होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा 'वीकेंड का वार'चा आहे. ज्यात समर्थच्या बोलण्यावरून ईशा थोडी नाराज दिसत आहे. दोघेही बेडवर बसून बोलत असताना समर्थ तिला किस करत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघेही पुन्हा एकदा ट्रोलच्या निशाण्यावर आले आहेत. समर्थ यांच्या या कृतीने शोचे चाहते हैराण आहेत. एका यूजरने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे की,'त्यांना टेम्पटेशन आयलंडवर पाठवा' तर अनेकांनी शोची तुलना लस्ट स्टोरीजसोबत केली आहे.

सलमानने 17 सेलिब्रिटीसोबत हा सिझन सुरु केला ज्यात अभिनेत्री मन्नारा चोप्रा, कॉमेडियन मुनावर फारुकी, ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांचा समावेश आहे. तर आता बिग बॉस हा शो ईशा आणि समर्थमुळे चर्चेत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT