bigg boss 7 contestant kamya panjabi opens up on her first unhappy marriage with bunty negi 
मनोरंजन

काय सांगायचं जे होतं ते बरं; काम्यानं सांगितला लग्नाचा अनुभव 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बिग बॉसची माजी स्पर्धक काम्या आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. काम्या सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. काम्यानं सांगितल्यानुसार तिनं बंटी नेगी बरोबर लग्न केले होते. त्यावेळी तिनं आपलं पहिलं लग्न वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र त्यानंतर तिला वेगळे व्हावे लागले. आता काम्यानं त्यावेळचे काही अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहत्यांनीही तिला त्यावर सहानुभुती दर्शवली आहे. काम्यानं पंजाबीनं काही दिवसांपूर्वी शलभ डांगच्या बरोबर वेडिंग अॅनीव्हर्सरी सेलिब्रेट केली आहे.

सध्या काम्या चर्चेत आली आहे याचे कारण म्हणजे तिनं बंटी नेगी सोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. त्यावेळी तिनं अनेक खुलासे केले आहेत. खरं तरं काम्याला वेगळे व्हायचं नव्हतं. इ टाईम्सशी बोलताना काम्यानं सांगितले की, इ टाइम्सशी बोलताना सांगितले की, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास माझ्यासाठी काहीही अवघड नव्हते. आणि आता हे सांगायला मला कुणाचीही भीती वाटत नाही. माझ्या आणि बंटीच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. ते वाचविण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. मला ते सगळं काही करायचं नव्हतं. हे प्रकरण खूप दिवस चालले होते.

काम्यानं पुढं सांगितले की, मी एका अॅवॉर्डच्या शो मधून आले होते त्यावेळी आरशात पाहून विचार करत होते की मी तिच व्यक्ती आहे की जिला लोकं मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत होते. तेव्हा मी नाराज झाले. आणि स्वतला अधिक दुबळी मानायला लागले. मात्र आता मला कशाचाही पश्चाताप नाही. कारण मी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी आराचा जन्म झाला. मात्र आजही काही गोष्टी तशाच आहेत जशा त्या पूर्वी होत्या.

काम्यानं सांगितले की, मी माझ्या घरच्यांसोबत चर्चा केली होती. माझ्या मित्रांनी मला हे नातं तोडण्यासाठी सांगितले होते. ते म्हणाले, काही करुन हे नातं आता संपव. त्यात काहीही राहिलेलं नाहीये. जेव्हा नातं संपलं तेव्हा बंटीचा अपघात झाला आणि तो बेड रेस्टवर होता.मला त्यावेळीही असे वाटले होते की, माझ्याकडून खूपच विरोध होतो आहे, मात्र पुन्हा ती वेळ आली की जिने आपण वेगळचं झालेलं चांगलं असे सांगितलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT