Bigg Boss Marathi 4 Rakhi sawant  Esakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: झोपूचं देणार नाय...राखीला झालयं तरी काय?

सकाळ डिजिटल टीम

'बिग बॉस मराठी ४' चा खेळ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. घरात ८५ दिवसांपासून टिकून असलेले स्पर्धक आता अंतिम फेरीत जाण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. गेले ८५ दिवस या घरात मैत्री, राडा, भांडणं आणि धमाल सगळं प्रेक्षकांना पाहायला मिळालं. पण आता बिग बॉसने उडवली आहे सगळ्यांची झोप.

सध्या रंजक वळणावर आहे. स्पर्धेतील रंजकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ‘बिग बॉस मराठी ४' चा विनर कोण होणार, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. त्यातच आता बिग बॉसने घरातील काही सदस्यांची झोप उडवली आहे. बिग बॉसच्या घरात एक नियम आहे घरात जर लाईट चालू असते तेव्हा झोपायला परवानगी नाही तरीही घरातील काही सदस्य झोपलेले होते तर बिग बॉसने शिक्षा देण्यासाठी भर दिवसा घरातील लाईट बंद करून घरात अंधार केला.

कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून बिग बॉस मराठी ४ चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये बिग बॉसने एक आदेश देत सांगितलं की घरातील दिवे सुरु असतांना काही सदस्य झोपलेले आहेत तर आता बिग बॉस लाईट बंद करणाऱ्याचा विचार करत आहेत असं म्हटंल्यानंतर घरातील लाईट बंद केले आहे. राखी, अक्षय, किरण अमृता आणि आरोह हे सगळे झोपताना दिसत आहेत.

तेव्हा घराचा कर्णधार असलेला आरोह बोलतो की माझं तुम्ही ऐकता का त्यावर अपुर्वा बोलते तुही झोपलेला होता तुझ्यासाठी पण बेल वाजली होती, सतत झोपा काढणारी राखी बोलते आजपासून मीच कोणाला झोपू देणार नाही. आता घरातील सदस्यांना कितीवेळ बिगबॉस उकाड्यात ठेवणार आणि त्याची कशी परिस्थीती होणार हे पाहण्यासारखे असेल.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! कृषी पंपांचे ४८ हजार कोटींचे जुने वीजबिल माफ; महायुती सरकारचा निर्णय

Hockey : सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज! महाराष्ट्राची ऋतुजा पिसाळचीही निवड; २० खेळाडूंची नावं जाहीर

Latest Marathi News Live Update : एनडीए (NDA) संसदीय पक्षाच्या बैठकीला 'मंगल मिलन' असे नाव देण्यात आले

Maharashtra Gram Panchayat Elections : राज्यातील 15,155 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार! 'या' दिवशी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी; कधी होणार मतदान?

ROHIT SHARMA RECORDS: रोहित शर्माचे 'हे' ५ जागतिक विक्रम मोडणं अशक्य! नंबर १ रेकॉर्ड तर कदाचित कधीच तुटणार नाही

SCROLL FOR NEXT