Bigg Boss Hindi 16 simi grewal entry in show Google
मनोरंजन

Bigg Boss 16: 'एका डीशमध्ये टीना आणि दुसरी मध्ये..', सिमी ग्रेवालच्या प्रश्नावर शालीननं मारली पलटी..

बिग बॉसच्या घरात सिमी ग्रेवाल यांनी एन्ट्री घेत स्पर्धकांसोबत प्रश्नोत्तरांचा रंजक खेळ खेळला आहे.

प्रणाली मोरे

Bigg Boss 16: बिग बॉस शो जसजसा शेवटच्या टप्प्यात पोहोचत आहे, तसतसा तो रंजक होत आहे. सध्या बिग बॉसमध्ये फॅमिली वीक सुरू आहे, त्याच दरम्यान घरात खास पाहुण्यांची एंट्री होणार आहे.

शोच्या आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये सिमी ग्रेवाल बिग बॉसमध्ये दिसणार असल्याचे दाखवण्यात आले होते. विशेष म्हणजे ती घरातील सदस्यांसोबत एक खास खेळ खेळणार आहे. ज्यामध्ये टीना दत्ताचं मन दुखावलं जाणार आहे.(Bigg Boss Hindi 16 simi grewal ask question to shalin bhanot)

९० च्या शतकात सिमी ग्ररेवालचा "रेन्डेज़वस विद सिमी ग्रेवाल” शोने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची आणि बड्या बिझनेसमन लोकांची मुलाखत घेऊन त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचे खुलासे समोर आणले होते. आता सिमी ग्रेवाल बिग बॉसच्या घरात येऊन सर्व स्पर्धकांची चर्चा करणार आणि काही टास्क खेळणार आहे.

समोर आलेल्या इंट्रेस्टिंग प्रोमोत घरात बागेच्या परिसरात तयार करण्यात आलेल्या सेटअपमध्ये सिमी ग्रेवाल यांच्यासमोर स्पर्धक बसलेले दिसत आहेत. त्यांनी सर्वप्रथम प्रियंका चहर चौधरी हिची चौकशी केली. प्रियंकाच्या उत्तराने चाहते चांगलेच प्रभावित झाले आहेत.

प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे, सिमी ग्रेवाल घरात प्रवेश करताच, बिग बॉस तिचं हटके पद्धतीनं स्वागत करतात. सिमी ग्रेवाल प्रियांकाला विचारताना दिसत आहे की, 'तिच्या समोर दोन प्लेट्स असतील, एक स्टारडम आणि दुसरी प्रेम, तर ती कोणती प्लेट निवडेल?' यावर प्रियांका म्हणते की ती प्रेमाची निवड करेल. ती म्हणते की जर तुम्ही आयुष्यात आनंदी असाल तर त्यापुढे आणखी काहीच महत्त्वाचे नाही.

सिमीने शालीनला देखील भन्नाट प्रश्न केला. त्या विचारतात, 'शालीन जर तुझ्यासमोर दोन प्लेट्स असतील आणि एकात टीना आणि दुसर्‍यामध्ये चिकन तर... प्रश्न पूर्ण करण्यापूर्वी शालिन म्हणतो, "मॅडम, मी दुसरी प्लेट निवडेन, त्यात काहीही असले तरी." सिमी लगेच म्हणतात की, 'तू टीनाची निवड करणार नाही, तिच्याबाबतीत इतका कठोर होऊ नकोस". हे ऐकून सर्व स्पर्धक हसतात, तर टीनाच्या चेहऱ्यावर नाराजीचा रंग दिसतो.

विशेष म्हणजे, शेवटच्या एपिसोडमध्ये टीना दत्ता आणि शालीन भानोतची आई घरात दाखल झाल्या होत्या. दोघींनीही मुलांना एकमेकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. शालीनची आई त्यांना सांगते की टीना खोटं वागत आहे आणि बाहेर हे सर्व काही चांगला मेसेज पोहोचवत नाहीय.

त्याचवेळी टीनाच्या आईनेही शालीनच्या प्रेमाला शो ऑफ असल्याचे म्हटले. आगामी एपिसोडमध्ये, सौंदर्या शर्माची आई, आणि सुंबुल तौकीरचे काका बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT